ताज्या घडामोडी

विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील: विशाल खांडेकर

Spread the love

कोकरुड/वार्ताहर
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी देशभक्त करिअर अकॅडमीचे शिक्षक नेहमी प्रयत्नशील आहेत असे प्रतिपादन संस्थापक विशाल खांडेकर यांनी केले.ते
शिंदेवाडी- मांगरुळ ता शिराळा येथील देशभक्त करिअर अकॅडमी व विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते. प्रारंभी आदर्शवत माता सखुबाई मारूती कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी संस्थापक विशाल खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना संस्थापक विशाल खांडेकर म्हणाले की, ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांच्या मध्ये गुणवत्ता आहे.फक्त त्यांना योग्य व मार्गदर्शन केल्यास ते निश्र्चितच यशस्वी होतील. देशभक्त करिअर अकॅडमी मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक स्टाफ नेहमी प्रयत्नशील आहेत. यावेळी विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास संस्थेचे कार्यवाह राहुल खांडेकर, ,प्राचार्य सुवर्णसिंग मस्के, क्रीडा शिक्षक नितिन कदम, अतुल मस्के, अमोल पाटील., अमोल ठोंबरे, जगदिश पाटील, अमृता वरेकर सुप्रिया पाटील, तेजश्री यादव दादासो पाटील सर्व शिक्षकस्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!