ताज्या घडामोडी

चांगभलं च्या गजरात जोतिबा देवाचा जागर संपन्न गर्दीचा उचांग :जोतिबा डोंगर गर्दीने फुलला

Spread the love

दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचा रविवारी चांगभलं च्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला .तबल दोन वरश्यानंतर भविकांसाहित जागर सोहळा संपन्न झाल्याने मोठा उत्साह भविकात दिसून आला .रविवारी पहाटे तीन वाजता मंदिर दरवाजे उघडण्यात आले.त्याच्या अगोदरच दर्शनासाठी प्रचंड गर्दी दरवाज्या बाहेर झालेली होती .चारही दरवाजातून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.मात्र चारही दरवाजावर नियंत्रण सुरळीत झाले नसल्याने काही भागात चेंगराचेंगरी झाली. मंदिरात प्रचंड बंदोबस्त होता पण आवश्यक असणाऱ्या दरवाजावर कोणताही बंदोबस्त नसल्याने भाविकांची झालेली गैरसोईमुळे भविकात संताप वेंक्त झाला.पहाटे पाच ते सहा या काळात श्रीना अभिषेक घालण्यात आला व श्रींची प्रमुख दहा गावकर प्रतिनिधी यांनी सप्तदल सोहम कमळ पुष्पतील सालंकृत महापूजा बांधली .सकाळी नऊ वाजता श्रींचा धुपारती सोहळा सुरू झाला मंदिरातील देवकार्य करून श्री येमाई मंदिराकडे गेला .दुपारी परत हा सोहळा मंदिरात आला व तोफेच्या सलामी ने सांगता करण्यात आली.रविवारी जागर असल्याने मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले राहिले.दिवसभरात असंख्य भाविकांनी दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचे दर्शन घेतले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!