आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीच्या बी.व्होक कोर्सच्या प्रथमेश पारेकर ला रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये यश.

या स्पर्धेमध्ये विविध राज्यातील एकूण १००० पर्यंत विद्यार्थी सहभागी झाले होते.

Spread the love

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीच्या बी.व्होक कोर्सच्या
प्रथमेश पारेकर ला रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये ब्राँझ पदक मिळवले.of New Maharashtra Engineering B.Voc CoursePrathamesh Parekar won bronze medal in rifle shooting competition.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १२ एप्रिल.

शिर्डी येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय पातळीवरील रायफल शूटिंग या स्पर्धेमध्ये नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाचा बॅचलर ऑफ व्होकेशनल कोर्सच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विभागातील प्रथम वर्षात शिकत असलेल्या प्रथमेश रवींद्र पारेकर याने ब्राँझ पदक मिळवले.
या स्पर्धेमध्ये विविध राज्यातील एकूण १००० पर्यंत विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रथमेश हा मागील एक वर्षापासून राजेश भोसले यांच्याकडे प्रशिक्षण घेत असून, आई संगीता पारेकर आणि वडील रवींद्र पारेकर यांनी प्रथमेशला वेळोवेळी प्रोत्साहन दिले.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी मंत्री संजय बाळा भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार ,खजिनदार राजेश म्हस्के,कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ.विलास देवतारे, प्रबंधक विजय शिर्के, बी.व्होक विभागाचे समन्वयक दिनेश जाधव आदी मान्यवरांनी प्रथमेशचे आणि पालकांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!