मावळराजकीय

वेहेरगाव दहिवली ग्रूपग्रामपंचायतच्या सरपंचाविरूध्द आविश्वास ठराव सात मतांनी मंजूर..

मनमानी कारभार व निर्धारित वेळेत राजिनामा न दिल्याने सदस्यांनी ठराव आणला.

Spread the love

वेहेरगाव दहिवली ग्रूपग्रामपंचायतच्या सरपंचाविरूध्द आविश्वास ठराव सात मतांनी मंजूर ; मनमानी कारभार व निर्धारित वेळेत राजिनामा न दिल्याने सदस्यांनी ठराव आणला.

 आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा  प्रतिनिधी, १८ सप्टेंबर.

वेहेरगाव दहिवली ग्रूपग्रामपंचायतच्या सरपंचाविरूध्द अविश्वास ठराव सात मतांनी मंजूर करण्यात आला.मनमानी कारभार व निर्धारित वेळेत राजीनामा न दिल्याने सदस्यांनी ठराव आणला,असे सदस्यांनी सांगितले.

या विशेष सभेच्या अध्यक्षपदी मावळचे तहसिलदार विक्रम देशमुख यांनी ता.१५ रोजी विशेष सभा बोलावली होती.त्यांना सहाय्यक म्हणून ग्रामविकास अधिकारी गणेश राजू आंबेकर यांनी सहाय्यक म्हणून कामकाजात भाग घेतला.

सरपंच आर्चनाताई संदिप देवकर या अनुपस्थित होत्या.
यावेळी तहसिलदार  देशमुख यांनी सरपंच अर्चनाताई देवकर यांचेविरूध्द आलेला आविश्वास ठराव सभेसमोर मांडला. ग्रामपंचायत सदस्या.पूजा अशोक पडवळ यांनी सरपंचाविरूध्द अविश्वास प्रस्तावास अनुमोदन दिले.यावेळी तहसिलदार.देशमुख यांनी ठरावाचे वाचन करून मतदानाबाबत माहिती दिली, त्यावर हात उंचावून मतदान घेतले.

यावेळी उपसरपंच काजल मोरेश्वर पडवळ,सदस्य सुनिल जयवंत येवले, अमर नाना बोरकर, अनिल बबन गायकवाड, सदस्या योगिता नवनाथ पडवळ,पूजा अशोक पडवळ,वर्षाताई संतोष मावकर यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने हात उंचावून मतदान केले. माजी सरपंच व सदस्य राजूशेठ दशरथ देवकर यांनी तटस्थ राहून कुणालाच मतदान केले नाही, त्यामुळे सरपंच अर्चनाताई देवकर यांना एकही मत पडले नाही. सुमारे सात विरूद्ध शुन्य, असा सात मतांनी आविश्वास ठराव मंजूर झाला.

यावेळी गावात व ग्रामपंचायतीचे कार्यालयाबाहेर लोणावळा ग्रामिण पोलिसनिरिक्षक किशोर धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.लवकरच सरपंचपदी नवीन सदस्यांपैकी एकाची निवड करण्यात येईल. सरपंचांनी मनमानी कारभार केला.कुणालाही विश्वासात घेतले नाही , पतीचा वाढता हस्तक्षेप आणि दिलेल्या ठराविक काळात राजीनामा न दिल्यामुळे हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला, असे सदस्यांनी सांगितले.

तूर्त तरी ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त झाल्याने गणेशोत्सवाच्या काळात ग्रामपंचायतीचे कारभाराची जबाबदारी उपसरपंच व ग्रामसेवक यांचेवर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!