आरोग्य व शिक्षण

घरगुती गॅसच्या किमतीत पुन्हा वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

Spread the love

मुंबई : ऐन सणांच्या काळात महागाईचा भडका उडाला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घरगुती गॅस सिलेंडरची भाव वाढ करण्यात आली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती सिलेंडरच्या किमती वाढवल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.

विनाअनुदानित सिलेंडरच्या किमतीमध्ये बुधवारी वाढ करण्यात आली. 14.2 किलोच्या सिलेंडरवर 15 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईतील गॅस सिलेंडरची किंमत 899.50 रुपये झाली आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!