आरोग्य व शिक्षण

तळेगाव शहर पोलिस प्रशासनाकडून नागरिकांना शांततेचे तसेच सहकार्याचे आवाहन

Spread the love

तळेगाव : उद्यापासून राज्यात तसेच देशभरात नवरात्र उत्सव सुरू होत आहे. तसेच अनेक महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे भाविकांसाठी उघडण्यात येणार आहेत. या संदर्भात आज तळेगाव शहर पोलिस प्रशासनाने शहरातील नवरात्र उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात पोलीस प्रशासनाने सर्व मंडळांना कोविडच्या अनुषंगाने शांततेत नवरात्र उत्सव पार पाडण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलत असताना पोलिस निरीक्षक शहाजी पवार म्हणाले की, “जसा गणपती उत्सव शांततेत पार पाडला तसाच नवरात्र उत्सवही पार पाडावा, तसेच बऱ्याच दिवसांपासून बंद असलेली मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली होणार आहेत त्यामुळे लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उत्साह असणे सहाजिक आहे. त्यांची ती दैवते आहेत परंतु त्यांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे व सॅनिटायजरचा वापर करावा आणि पुन्हा कोविड वाढणार नाही याची काळजी घ्यावी.” यावेळी त्यांनी जनतेला पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!