आरोग्य व शिक्षण

माध्य. विद्या. वरवडे, भागशाळा वाटद-खंडाळा, श्रीम. पा. शं. बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद-खंडाळा येथे   राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा 

Spread the love

यावेळी . मुख्याध्यापक श्री. गरूड सर आणि अन्य सहकारी शिक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून थोर भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच त्यानिमित्त रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. सदर रांगोळी प्रदर्शनात *मयुरी भोसले, श्रावणी वझे, श्रुती कासार, पूर्वा महाडिक, तन्वी सकपाळ, आर्या शेट्ये, अनुष्का धुमाळ या ८वी (क) आणि कांचन साठे, स्वरदा साठे,धनस्वी माने, मृणाल भडसावळे ७वी (क) सौमित्र जोशी११वी (विज्ञान)* या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
तसेच श्री . गोडबोले सर यांनी व्यसनमुक्तीपर गीत* सादर केले. त्यांना मोहित सर आणि धोपट सर यांनी संगीत साथ दिल्यामुळे उत्तम असा माहोल तयार झाला. सदर गीतास विद्यार्थ्यांनी आपल्या टाळ्यांची साथ देऊन तल्लीनतेने गाण्याची मजा घेतली.
प्रा. पाटिल सर यांनी विज्ञान दिनाविषयी छान माहिती दिली. तसेच मा. मुख्याध्यापक श्री. गरूड सर यांनी शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन *सौ . पाटिल मॅडम आणि श्रीम. आंबडारे मॅडम* यांनी केले. तसेच श्री. संजय जाधव सर यांनी सुत्र संचालन केले. त्यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विजय जोशी आणि सर्व सहा. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!