आरोग्य व शिक्षण

पुण्यात पेट्रोल 110 रुपयांवर; तर डिझेल शंभरच्या घरात

Spread the love

पुणे : पुणे पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात पेट्रोलच्या दराने 110 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. डिझेलच्या दरातही वाढ झाली असून ते 100 रुपये झाले आहे.

सप्टेंबर महिन्यात पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ काही काळ थांबली होती. परंतु 28 सप्टेंबर पासून दरात पुन्हा वाढ सुरू झाली. मागील साडेचार महिन्यात पेट्रोलच्या दरात 10 रुपये तर डिझेलच्या दरात 9 रुपयांची वाढ झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीला पुणे शहरात पेट्रोलचा दर लिटरमागे 90 रुपये तर डिझेलचा दर 79 रुपये होता. त्यात भर पडून पेट्रोल 20 आणि डिझेल 19 रुपयांनी महागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!