आरोग्य व शिक्षण

सेव द चिल्ड्रन (बाल रक्षा भारत) यांच्याकडून मावळ मध्ये न्यूट्रिशन फोर झिरो हंगर या प्रकल्पाचे उद्घाटन

Spread the love

मावळ : ‘सेव द चिल्ड्रन’ ही जगभरातील 120 देशांमध्ये काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे . संस्थेचे भारतात एकूण 17 राज्यात काम सुरू आहे .महाराष्ट्रात सेव्ह द चिल्ड्रन मुंबई, पुणे ,नाशिक जिल्ह्यात कार्यरत आहे .

मावळ तालुक्यात सेव्ह द चिल्ड्रन संस्थेतर्फे “न्यूट्रिशन फोर झिरो हंगर” ह्या प्रकल्पाचा उद्देश गर्भवती माता, स्तनदा माता व 0 ते 6 वर्ष या वयोगटातील मुलांमधील कुपोषण प्रमाण कमी करण्याचे आहे . हा प्रकल्प तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने राबविला जात आहे .सदर प्रकल्पास हरबा लाइफ न्युट्रिशन यांचे आर्थिक सहाय्य लाभले आहे . मावळ तालुक्यातील 340 अंगणवाडी केंद्र ,11 बीट व सहा आरोग्य केंद्रे या कार्यक्षेत्रात हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.

प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी मा. गटविकास अधिकारी श्री सुधीर भागवत , मा. बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री विशाल कोतागडे ह्यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी मावळ तालुक्यातील सर्व आयसीडीएस सुपरवायझर, आशा सुपरवायझर, वैध्य्कीय अधिकारी , इतर स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सेव्ह द चिल्ड्रेन संस्थेतर्फे जितेंद्र सावकार अपर्णा जोशी, दीप्ती हजारी , डॉ. स्वप्नील निमकर, डॉ.ललिता महाजन ,डॉ .ओपी सिंग, डॉ. अंतर्यामी दास, शिरीन मॅथ्यु , न्यूट्रिशन काउंसलर टीम उपस्थित होती .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!