आरोग्य व शिक्षण

आमदार शेळके यांचे तालुक्यातील भाजप नेत्यांना आव्हान; 36 पैकी 15 तरी मत मिळवा

Spread the love

तळेगाव : आज (दि 10 नोव्हेंबर) रोजी झालेल्या पुणे महानगर नियोजन समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुनील शेळके यांनी काल पत्रकार परिषदेत भाजपच्या नगरसेवकांनी काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करण्याच्या सूचना तालुक्यातील भाजप नेते देत असल्याचा आरोप केला. तसेच भाजपचे लोक निष्ठावंत आहेत. ते आपली निष्ठा सोडणार नाहीत पक्षाशी प्रामाणिक राहतील अशी पुस्तीही जोडली.

आमदारांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी पत्रकार परिषद घेतली. राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आल्यास तो डोईजड होईल म्हणून त्याला पाडण्यासाठी काँग्रेसला मतदान करा असे आमदार सुचवत आहेत का असा प्रश्न उपस्थित करत तिकिटासाठी एका रात्रीत पक्षबदल करणाऱ्यांनी पक्षनिष्ठेची भाषा करू नये असा टोला लगावला.

या आरोपांना उत्तर देताना मी उघडपणे पक्ष सोडला आहे. पण निष्ठेची भाषा बोलणाऱ्या नेत्यांनी भाजपच्या 36 नगरसेवकांपैकी 15 तरी मतदान तुमच्या उमेदवाराला पाडून दाखवा असे आव्हान आमदार सुनील शेळके यांनी दिले.

यासंदर्भात भाजपच्या पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्याशी संपर्क साधला असता जे आहे ते निकालात दिसेलच. निकालानंतर योग्य उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया दिली. यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय आतिशबाजी सुरू झाली आहे का?असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलाय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!