ताज्या घडामोडी

निवृत्त रयत सेवक संघ सांगली वार्षिक सभा संपन्न

Spread the love

सांगली दि. 26ःरयत शिक्षण संस्था व इतर संस्थांच्या शाखेतून सेवानिवृत्ती झालेल्या सेवकांच्या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
सांगली शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब पत्रावळे सभागृहात ‘ जरी सेवानिवृत्त तरी कार्यरत ‘ हे ब्रीद घेऊन हा संघ अध्यक्ष एस वाय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली काम करत असून भविष्यात सामाजिक कार्यात समर्पित भावनेने सहभागी होऊन सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्रिय होणार असल्याचे प्राचार्य जाधव यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक मोळाज यांनी केले. यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
या सभेत विविध ठरावांचे वाचन केले व त्याला सर्वांनी एकमुखाने मंजुरी देण्यात आली.
यावेळी अध्यक्ष एस वाय जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.या सभेस सर्व संचालक, कार्यकारिणी सदस्य व सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!