ताज्या घडामोडी

हर घर तिरंगा स्पर्धेमध्ये श्री. लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालयाचे यश

Spread the love

जाकादेवी/ वार्ताहर:-
पंचायत समिती रत्नागिरी, शिक्षण विभागातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “हर घर तिरंगा “उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये येथील श्री.लक्ष्मीकेश माध्यमिक विद्यालय कसोप -फणसोप येथील इ. दहावीमध्ये शिक्षत असलेला विद्यार्थी कु. विक्रांत विजय शिंदे याने माध्यमिक गटामध्ये तालुक्यात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.
शामराव पेजे सभागृह, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे नुकत्यात पार पडलेल्या बक्षीस वितरण समारंभामध्ये राज्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री श्री. उदय सामंत यांच्या हस्ते विक्रांत शिंदे याला प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
यशप्राप्त विद्यार्थ्याला उपक्रमशील कलाशिक्षक श्री. उत्तम पवार यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. राजेशिर्के ,सर्व शिक्षक, संस्था पदाधिकारी यांनी यशप्राप्त विद्यार्थी व मार्गदर्शक कलाशिक्षकांचे खास अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!