आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाघजाई देवी मंदिरास, मावळचे उद्योजक रामदास आप्पा काकडे यांच्यातर्फे लोखंडी बेंच प्रदान सोहळा संपन्न…

खंडाळा येथील वाघजाई देवी. भाविकांची एक गरज ओळखून ज्येष्ठ नागरिक तसेच महिला वर्गाला बसण्यासाठी लोखंडी बेंच आज प्रदान..

Spread the love

वाघजाई देवी मंदिरास, मावळचे उद्योजक रामदास आप्पा काकडे यांच्यातर्फे लोखंडी बेंच प्रदान सोहळा संपन्न

आवाज न्यूज: मावळ, २६ सप्टेंबर

नवरात्र म्हटलं की मावळातील सुप्रसिद्ध व भक्तांना पावणारी देवी अशी ख्याती असणारी तसेच महाराष्ट्रातून अनेक भाविक भक्त ज्या मावळातील देवींचे दर्शन घेण्यासाठी ये जा करत असतात ती देवी म्हणजे खंडाळा येथील वाघजाई देवी.
भाविकांची एक गरज ओळखून ज्येष्ठ नागरिक तसेच महिला वर्गाला बसण्यासाठी
खंडाळा येथील वाघजाई देवी मंदिर परिसरात तळेगाव दाभाडे येथील उद्योजक रामदास आप्पा काकडे यांच्या मार्फत क्षणभर विश्रांती घेण्यासाठी लोखंडी बेंच आज प्रदान करण्यात आले.त्याप्रसंगी खंडाळा येथील श्री वाघजाई देवी मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष चंद्रकांत लांघे ,उपाध्यक्ष चंद्रकांत कचरे (पाटील ) यांच्या उपस्थितीत तळेगाव दाभाडे येथील युवा उद्योजक रणजीत काकडे मित्रपरिवारातील गणेश गरुडे सुमित जाधव ,गोरख काकडे ,सोनू मराठे हे उपस्थित होते.
येत्या नवरात्र मध्ये तळेगाव दाभाडे येथील मुंबई- पुणे महामार्गावर असणारी सुप्रसिद्ध अमर देवी तसेच कार्ला येथील एकवीरा देवी व खंडाळा येथील वाघजाई देवी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भक्तांना रामदास आप्पा काकडे यांच्यामार्फत प्रसाद वाटप होणार आहे अशी माहीती युवा उद्योजक रणजीत भाऊ काकडे मित्र परिवाराचे सभासद गोरख काकडे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!