अध्यात्मिकआपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

दिलासा मेडिकल ट्रस्ट आणि Aniruddha’s Academy of Diaster Management अंतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

रविवार २३ एप्रिल २०२३ वेळ: सकाळी ९:०० ते दुपारी ५:०० स्थळ : थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळा,मारुती मंदिर चौक, तळेगाव दाभाडे येथे संपन्न होणार आहे.

Spread the love

दिलासा मेडिकल ट्रस्ट आणि Aniruddha’s Academy of Diaster Management अंतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.A grand blood donation camp is being organized under Dilasa Medical Trust and Aniruddha’s Academy of Disaster Management.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर,२१ एप्रिल.

रविवार २३ एप्रिल २०२३ वेळ: सकाळी ९:०० ते दुपारी ५:०० स्थळ : थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळा,मारुती मंदिर चौक, तळेगाव दाभाडे येथे संपन्न होणार आहे तरी इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन Aniruddha’s Academy of Diaster Management  संस्थेने  केले आहे.

आपण रक्तदान करून दुसऱ्या व्यक्तीचा प्राण वाचवण्यासमदत करु शकतो. आजच्या काळात रक्ताची गरज खूप वाढत चालली आहे. आणि रक्त हे कुठल्याच कारखान्यात तयार होत नसल्याने हे फक्त एका मानवाने दुसऱ्या मानवास दान करुनच मिळू शकते. आपण रक्तदान करून आपला खारीचा, पण खूप मौल्यवान वाटा समाजाच्या सेवेसाठी देऊयात. श्रेष्ठदान चला तर आपण सर्वांनी मिळून रक्तदान करुया. संपर्क : 9850767679, 9766831347

रविवारी ८२ ठिकाणी एकाचवेळी महारक्तदान शिबिराचे आयोजन.

 

श्री अनिरूद्ध आदेश पथक, दिलासा मेडिकल ट्रस्ट अँड रिहॅबिलिटेशन सेंटर, अनिरूद्धाज अॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, अनिरूद्ध समर्पण पथक या संस्थांनी एकत्र येत रविवार, दि. २३ रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आणि गोवा, गुजरात, कर्नाटक व मध्यप्रदेशात मिळून तब्बल ८२ ठिकाणी एकाच वेळी हे महारक्तदान शिविर पार पडेल. मुंबईतूनच सुमारे आठ हजार युनिट इतके रक्तसंकलन केले जाईल, असा अंदाज आहे. डॉ. अनिरूद्ध जोशी, एम. डी. मेडिसिन (सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या या संस्था १९९९ सालापासून रक्तदान शिबिरांचे आयोजन करून आत्तापर्यंत १.६५ लाख युनिट इतके रक्त संकलित केले आहे. या रक्तदान शिबिराचा लाभ जवळपास शंभर रक्तपेढ्या घेणार आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!