अध्यात्मिकआपला जिल्हासामाजिक

हिंदू-मुस्लिम एकतेबाबत सर्वपक्षीय राजकारणी मंडळींचे एकमत; इफ्तार कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केल्या भावना.

Spread the love

हिंदू-मुस्लिम एकतेबाबत सर्वपक्षीय राजकारणी मंडळींचे एकमत; इफ्तार कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केल्या भावना.Consensus of all party politicians on Hindu-Muslim unity; Emotions expressed during the Iftar program.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २१ एप्रिल.

तळेगाव दाभाडे गावभागातील जामा मस्जिद मध्ये गुरुवारी(ता.20) ट्रस्टतर्फे आयोजित सर्वपक्षीय मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या इफ्तार कार्यक्रमात हिंदू-मुस्लिम एकतेबाबत सर्वपक्षीय राजकारणी मंडळींचे एकमत असल्याचे त्यांच्या भाषणातून समोर आले आहे.माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, भाजपा जिल्हा अध्यक्ष गणेश किसन भेगडे, तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे, जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे आणि आमदार सुनील शेळके यांनी आपापल्या कार्यकर्त्यांसह इफ्तार कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती लावली.

तळेगाव दाभाडे येथील हिंदू मुस्लिम कुटुंबाच्या अनेक पिढ्यांमध्ये सलोखा आणि एकतेचे नाते असून ते आजही कायम असल्याचे मत गणेश भेगडे यांनी व्यक्त केले. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी तोच धागा धरत तळेगाव दाभाडे शहरातील जुन्या पिढीतील मुस्लिम कार्यकर्त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंजूर केलेल्या कामांची घोषणा यावेळी केली. त्यामध्ये डोळसनाथ महाराज कब्रस्थान वॉल कंपांउंडसाठी 19 लक्ष रुपये, कब्रस्थान विकसित करण्यासाठी 10 लक्ष रुपये, खडक मोहल्ला येथे मुस्लिम जमात साठी 10 लक्ष तर कडोलकर कॉलनी ईदगाह मैदानासाठी 15 लक्ष रुपये लाईटचे पोलसाठी आणि सुधारणांसाठी 10 लक्ष रुपये मंजूर केल्याचे माजी राज्यमंत्री भेगडे यांनी सांगितले. ते म्हणाले, की उर्से कब्रस्थानच्या संरक्षण भिंत बांधणेकामी 10 लक्ष देऊन कामाला सुरुवात झाली आहे.

 

भाजपा तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी मावळातील जातीय सलोख्याचे वातावरण चांगले असल्याचे सांगून रोजाचे महत्त्व कथित करून ईदच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. शाळीग्राम भंडारी यांनी शेरोशायरीतून मानवता आणि भाईचारा यांची उदाहरणे देत मनोगत व्यक्त केले.
आमदार सुनील शेळके यांनी राज्यातील त्यांची सत्ता गेल्याची खंत व्यक्त करत राहिलेल्या दीड वर्षाच्या कालावधीत मुस्लिम बांधवांनी त्यांच्या समाजसाठीची कामे दिली तर ती पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष खांडगे यांचेही यावेळी भाषण झाले. यावेळी शहर अध्यक्ष गणेश काकडे उपस्थित होते.

ट्रस्टचे विश्वस्त रशीदभाई सिकिलकर, ज्येष्ठ नेते बाबूलाल नालबंद आणि अमिन खान यांच्या मार्गदर्शनाखाली रफीकभाई सिकिलकर, शकील भाई सिकिलकर, अजीज भाई नालबंद,अकबर नालबंद,लालाभाई नालबंद,बाबाभाई मणियार,मुबिन सिकीलकर, असलम भाई सिकिलकर, सादिक भाई सिकिलकर, मुशर्रफ सिकिलकर ,मोईन सिकिलकर, अफाक सिकिलकर, इम्तियाज नालबंद, अकील नालबंद, जिया सिकिलकर शोएब नालबंद, रईस नालबंद, शादाब नालबंद, अरबाज शिकीलकर, आयान नालबंद, अकिब मनियार, तौसीफ जमादार यांनी इफ्तार कार्यक्रमाचे संयोजन केले. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन पत्रकार अमिन खान यांनी केले तर आभार बाबूलाल नालबंद यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!