आपला जिल्हाताज्या घडामोडीसामाजिक

छोट्या हॉटेल चालकांना रात्री अकरा पर्यंत व्यवसाय करू द्यावा…किशोर आवारे.

Spread the love

छोट्या हॉटेल चालकांना रात्री अकरा पर्यंत व्यवसाय करू द्यावा…किशोर आवारे.Small hotel operators should be allowed to do business till 11 pm…teenagers.

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे वार्ताहर,२१ एप्रिल.

तळेगाव शहरातील छोट्या हॉटेल चालकांना व चायनीज हॉटेल चालकांना रात्री अकरा पर्यंत
व्यवसाय करण्याची परवानगी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन यांनी द्यावी अशा मागणीचे पत्र सहाय्यक पोलीस निरीक्षक मारोती मद्देवाड यांना देण्यात आले.

तळेगाव शहरांमध्ये अनेक स्थानिक नागरिक तसेच परप्रांतीय देखील छोटे व्यवसाय करीत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने चायनीज स्टॉल, स्नॅक्स स्टॉल, ज्यूस स्टॉल ,आईस्क्रीम स्टॉल, चाट मसाला स्टॉल च्या माध्यमातून आपल्या रोजी रोटीचा प्रश्न सोडवत आहेत.तळेगाव दाभाडे पोलीस प्रशासनाने सर्वांना रात्री दहापर्यंत व्यवसाय करावा अशी विनंती केली होती . सर्व छोट्या हॉटेल व्यवसायिकांनी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष. किशोर आवारे यांच्याकडे सदर प्रश्न सोडवण्यासाठी विनंती केली होती.

सायंकाळी सात ते दहा व्यवसाय करण्यास निर्बंध घातल्यामुळे मिळणारा निव्वळ नफा अत्यल्प असल्याचे व्यवसायिक धारकांनी जनसेवा विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.त्यामुळे सर्व छोट्या व्यवसायिकांना रात्री दहा ऐवजी अकरा पर्यंत व्यवसाय करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी पोलीस स्टेशन येथे विनंती पत्र देण्यात आले.तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवदवाड, यांचे तळेगाव शहरावर, गावातील नागरिकांवर प्रेम असल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यापाऱ्यांच्या हिताचा निर्णय लवकरच घेतील असा विश्वास जनसेवा विकास समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी चायनीज असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता भोसले, प्रवक्ते मिलिंद अच्युत ,जनसेवा विकास समितीचे संघटक योगेश पारगे, शिवसेना तालुका संघटक सुनील उर्फ मुन्ना मोरे, नगरसेवक रोहित लांघे, पोलीस अधिकारी प्रशांत वाबळे, बाबाराजे मुंडे, किशोर गिरीगोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!