ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

SSC Result 2022 Date: प्रतीक्षा संपली; दहावीचा ऑनलाइन निकाल उद्या होणार जाहीर.

Spread the love

पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (SSC Board) इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवार १७ जून रोजी जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येईल. दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. राज्यातून एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मुख्य केंद्र आणि उपकेंद्र मिळून २१ हजार ३८४ ठिकाणी परीक्षा पार पडली. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका कधी मिळणार ते निकालादिवशी कळविण्यात येणार आहे.

 

पुढील संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल –

http://www.mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://ssc.mahresults.org.in

 

http://www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

https://twitter.com/VarshaEGaikwad/status/1537347204674748416?s=20&t=ahkOP__3rKmIv79sCB90cA

परीक्षा केंद्रे आणि विद्यार्थी

 

एकूण परीक्षा केंद्रे – २१ हजार ३८४

मुख्य केंद्रे : ५ हजार ५०

उपकेंद्रे : १६ हजार ३३४

परीक्षा अर्ज भरलेले विद्यार्थी : १६ लाख ३८ हजार १७२

विद्यार्थी : ८ लाख ८९ हजार ५८४

विद्यार्थिनी : ७ लाख ४९ हजार ४७८

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!