आरोग्य व शिक्षण

श्रीडोळसनाथ नागरी  सहकारी पतसंस्थेच्या,अध्यक्षपदी राहुल पारगे यांची बिनविरोध निवड.

Spread the love

श्रीडोळसनाथ नागरी  सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राहुल पारगे यांची बिनविरोध निवड जाहीर.                    

आवाज न्यूज – श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेच्या अध्यक्षपदी राहुल पंढरीनाथ पारगे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी निलेश राजाराम राक्षे आणि विकास दशरथ कंद यांची निवड झाली.

डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या सचिवपदी  आतुल चंद्रकांत राऊत व खजिनदारपदी कौस्तुभ बबनराव भेगडे यांची निवड करण्यात आली. मा.नगरसेवक संतोष भेगडे, शरद भोंगाडे, अंकुश आंबेकर यांची संचालकपदी, आशिष खांडगे, संध्या  देसाई, मेघा संदीप भेगडे,  यांची संचालकपदी तर समीर भेगडे, वैभव भेगडे, विजय भेगडे, अभिषेक मराठे, प्रवीण मुर्ते, दत्तात्रय भेगडे, अमित भसे, अरविंद गद्रे, राकेश खळदे, दिनकर भेगडे, यांची निमंत्रित संचालक म्हणून तर डॉ शाळीग्राम भंडारी, महेशभाई शहा, विलास भेगडे, चंद्रजीत वाघमारे व संजय ओसवाल यांची सल्लागारपदी निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक संतोष भेगडे यांनी केले. त्यात ते म्हणाले, यावर्षी संस्थेने 25 कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला या वर्षी 62 कोटीची आर्थिक उलाढाल केली आहे. आलेल्या सर्व नवीन संचालक मंडळाने संस्था या प्रमाणे पुढे नेण्यास सहकार्य करावे असे त्यांनी सूचित केेेेले.

सर्व संचालकांनी संस्थेची आर्थिक बाजू सक्षम करण्याकरिता संस्थेतील ठेवी वाढविण्यास व सुयोग्य कर्ज वाटप करण्याकरिता संस्थेत सक्रिय होऊन काम करण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक बबनराव भेगडे यांनी केले.                                                  कार्यक्रमात शरद भोंगाडे यांनी सर्वांचे स्वागत केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही पी कोतकर यांनी कामकाज पहिले. विकास कंद यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!