आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमावळ

औदयोगिक समन्वयामुळे नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी ठरले देशात उत्कृष्ट.

विद्यार्थ्यांना औदयोगिक जगताशी जोडण्याचे काम नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीत सेंट्रल प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून..

Spread the love

औदयोगिक समन्वयामुळे नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी ठरले देशात उत्कृष्ट.Due to industrial co-ordination, New Maharashtra Engineering became the best in the country.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २९ जुलै.

रोजगाराभिमुख अभियांत्रिकी शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना थेट औदयोगिक जगताशी जोडणारा दुवा बनून नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाने गेली वर्षभर सातत्याने विविध आस्थापनांशी करार केले. कॅम्पस प्लेसमेंट्च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी सेंट्रल प्लेसमेंट सेलच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्याने, राष्ट्रीय पातळीवर झालेल्या सर्वेक्षणातून संस्थेचे तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालय राज्यात उत्कृष्ट ठरले आहे.

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तंत्रज्ञानाचे ज्ञान अवगत होणे यासाठी विविध औदयोगिक समूहासोबत काम करणे अपेक्षित असते. या पार्श्वभूमीवर औदयोगिक आस्थापना आणि शैक्षणिक संस्थांमध्ये समन्वय निर्माण करण्याची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना औदयोगिक जगताशी जोडण्याचे काम नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीत सेंट्रल प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून होत आहे.

औदयोगिक भेटी, संशोधन कार्य, अंतिम वर्षातील प्रकल्प, उपलब्धीचा एकत्रित वापर, उद्योजकतेचे धडे, कॅम्पस प्लेसमेंट, इंटर्नशिप आदी मुद्दयांवर काम करता यावे म्हणून नूतन महाराष्ट्र विद्या मंडळाने आजपर्यंत एकशे पन्नासहुन अधिक आस्थापनांशी सामंज्यस करार केले आहेत. याचीच दखल घेत डेटाकुईस्ट टी – शाळा रोजगार निर्देशांक सर्वेक्षण २०२३ नुसार महाराष्ट्रातील नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयास विना अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये रोजगार संधी उपलब्ध करण्यामध्ये ७२ व्या क्रमांकाचे मानांकन मिळाले.तसेच शासकीय व निमशासकीय विना अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये रोजगार संधी उपलब्ध करण्यामध्ये महाविद्यालयास ८१ वा क्रमांक प्राप्त होऊन औद्योगिक समन्वय संस्था म्हणून नूतन संस्थेचा गौरव करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष संजय तथा बाळा भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के, विश्वस्त रामदास काकडे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, सेंट्रल प्लेसमेंट चे अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. विलास देवतारे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. नितीन धवस,एनसीईआर च्या प्राचार्या डॉ.अपर्णा पांडे, आदी मान्यवरांनी आनंद व्यक्त केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!