आपला जिल्हामावळसामाजिक

कै कांतीलाल शहा यांचा आगळा वेगळा वाढदिवस किनारा वृद्धाश्रमात साजरा.

वृद्धाश्रमाच्या विस्तारीकरणास लागणाऱ्या भूखंडच्या आर्थिक मदतीसाठी उपस्थित रोटरी सदस्यांना आवाहन.शैलेशभाई शहा

Spread the love

कै कांतीलाल शहा यांचा आगळा वेगळा वाढदिवस किनारा वृद्धाश्रमात साजरा .Another special birthday celebration of Kai Kantilal Shah at Kinara Old Age Home.

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे वार्ताहर, २९ जुलै.

कै कांतीलाल शहांचा वाढदिवस एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने शुक्रवार दिनांक २८ जुलै रोजी संपन्न! शुक्रवारी प्रिती वैद्य संचालित किनारा वृद्धाश्रम, कामशेत येथे सकाळी रोटरी क्लब आँफ तळेगाव दाभाडे, मेडिकव्हर हॉस्पिटल, व नम्रता बिल्डर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कै. कांतीलाल शहा यांच्या जयंतीनिमित्त किनारा वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर तसेच जीवनावश्यक वस्तुचे वितरण करण्यात आले.

प्रिती वैद्य यांच्या या वृद्धाश्रमात अतिशय दयनीय अवस्थेत असलेले ६० आजी आजोबा आहेत,प्रीती मॅडम आईच्या मायेने त्यांचा सांभाळ करीत आहेत. मेडिकव्हर तर्फे या सर्वांची मेडिकल टेस्ट करण्यात आली. तपासणीत आढळलेल्या आजारावर डॉक्टर नेहा कुलकर्णी आणि डॉक्टर ज्योती मुंदर्गी या सर्व रुग्णांवर पूर्ण औषध उपचार करणार आहेत असे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

रोटरी अध्यक्ष उद्धवजीनी रोटरी व लायन्स क्लब तर्फे एकत्र येवून भविष्यात असेच मोठे प्रोजेक्ट्स उभे करू असे आपल्या भाषणात सांगितले. रो. कमलेश कार्ले यांनी आभार मानले.मेडिकव्हर चे सर्व कर्मचारी व डॉक्टर  यांचा सत्कार करण्यात आला. कै. कांतीलाल शहा यांच्या १०५ व्या जयंती निमित्त नम्रता ग्रुप तर्फे दीपकभाई व शैलेश भाई यांनी किनारा वृद्धाश्रमास जीवनावश्यक वस्तू ,अन्न धान्य दिले. त्याबरोबरच सोमाटणे फाटा येथील-” जीवन अंकुर संस्थेस” एक महिनाभर पुरतील अशा जीवनोपयोगी वस्तू आणि धान्याबरोबरच वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन दोन ड्रेस आणि चादरीही प्रदान करण्यात आल्या.

नम्रताग्रुप तर्फे आपलं मनोगत व्यक्त करताना शैलेशभाई शहा यांनी वृद्धाश्रमाच्या विस्तारीकरणास लागणाऱ्या भूखंडच्या आर्थिक मदतीसाठी उपस्थित रोटरी सदस्यांना आवाहन केले व त्याला भरघोस प्रतिसादही मिळाला. या कार्यक्रमास सर्व शहा कुटुंबीय व लायन महेशभाई शहा उपस्थित होते. लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांनी नम्रता ग्रुप आणि रोटरी क्लब तळेगाव दाभाडे यांनी राबवलेल्या या उपक्रमाचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक केलं‌. हा कार्यक्रम यशस्वी होण्यास डॉक्टर नेहा कुलकर्णी आणि डॉक्टर ज्योती मुंदर्गी यांनी विशेष परिश्रम घेतले. किनारा आश्रमातील वृद्धांच्या चेहऱ्यावर विशेष आनंद आणि समाधान उपस्थितांना जाणवत होता आणि हीच यशस्वी कार्यक्रमाची पावती होती .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!