देश विदेशमावळ

मणिपूर मधील महिलांवरील अत्याचार करणारै सहा आरोपींच्या कठोर शिक्षेची जमिन हक्क परिषदेकडून मागणी.

तहसिलदार विक्रम देशमुख यांना दिलेल्या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.

Spread the love

मणिपूर मधील महिलांवरील अत्याचार करणारै सहा आरोपींच्या कठोर शिक्षेची जमिन हक्क परिषदेकडून मागणी.Land Rights Council demands strict punishment for six accused of abusing women in Manipur.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, वडगाव मावळ प्रतिनिधी २९ जुलै.

मणिपूर मधील महिलांवरील अत्याचार करणारै सहा आरोपींच्या कठोर शिक्षेची जमिन हक्क परिषदेकडून तहसिलदार विक्रम देशमुख यांना दिलेल्या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.

जमिन हक्क परिषदेचे , सह्याद्री , सातपुडा , संस्थापक , अध्यक्ष माऊली भाऊ सोनवणे , संघटक एस.आर गुजर ,
प्रचारक दत्ताञेय दळवी , जालिंदर तुपे , मावळचे अध्यक्ष दिनकर नाना शेटे , महिला अध्यक्षा करूणा सरोदे , कायदेशीर सल्लागार अॕड. वनराज शिंदे , तानाजी गोळे , अशोक जाधव , सुभाष भालेराव , नामदेव निंबळे , विठ्ठल लोखंडे , दत्ताञेय वाघमारे , कांताराम भवारी , दिपक रवणे , हनुमंत वाघमारे , करिमभाई शेख आदींच्या सह्या असलेले निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले.

या वेळी.माऊली भाऊ सोनवणे व कार्यकर्ते यांनी भाषणातून मणिपूर मधील दुर्दैवी, महिलांवरील अत्याचारांच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून मणिपूर चे मुख्यमंत्री , तसेच देशाचे गृहमंत्री , व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही , असे वक्तव्य करून जोरदार घोषणा देण्यात आल्या.

यावेळी महिला पदाधिकारी यांनीही मोदी व शहा यांनी तात्काळ पायऊतार व्हावे , तसेच मणिपूर मधील दुष्कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी तात्काळ करावी , असे भाषणात व निवेदनातून मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!