अध्यात्मिकमावळसामाजिक

मोहरम सणाच्या पुर्वसंध्येला तळेगाव दाभाडे शहरात पोलीसांचा रुट मार्च..

उद्या दिनांक २८/७/२०२३ रोजी होणाऱ्या मोहरम सणाच्या अनुशंगाने तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत रुट मार्च.

Spread the love

मोहरम सणाच्या पुर्वसंध्येला तळेगाव दाभाडे शहरात पोलीसांचा रुट मार्च..Police route march in Talegaon Dabhade city on the eve of Moharram festival.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर, २८ जुलै.

शनिवार दिनांक २९/७/२०२३ रोजी होणाऱ्या मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीतील तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रुट मार्च घेण्यात आला. शुक्रवार दिनांक २८/७/२०२३ रोजी सायंकाळी पाच ते सव्वा सहा वाजेपर्यंत रुट मार्च संपन्न झाला.

उद्या दिनांक २८/७/२०२३ रोजी होणाऱ्या मोहरम सणाच्या अनुशंगाने तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीतील मारुती मंदिर चौक ते तेली आळी चौक ते राजेंद्र चौक ते जामा मस्जिद ते गणपती चौक ते शाळा चौक ते सुभाष चौक ते जिजामाता चौक ते मारुती मंदिर चौक या ठिकाणापर्यंत रूट मार्च घेण्यात आला.

सदरच्या रूट मार्च करिता तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांच्या समवेत तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन कडील, १ वपोनि, ३ सपोनि/पोसाई अधिकारी व १५ अंमलदार व एस आर पी एफ चे २५ अंमलदार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!