आपला जिल्हामावळ

दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे- तेथे कर माझे जुळती- असा एक कृतज्ञता सोहळा तळेगाव जनरल हॉस्पिटल मध्ये संपन्न.

शुक्रवार दिनांक २८ जुलै रोजी तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये नर्सिंग- जी एन एम कोर्सच्या विद्यार्थिनींना प्रत्येकी रुपये २५००० च्या स्कॉलरशिप वितरणाचा सोहळा संपन्न झाला.

Spread the love

दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे- तेथे कर माझे जुळती- असा एक कृतज्ञता सोहळा तळेगाव जनरल हॉस्पिटल मध्ये संपन्न.A gratitude ceremony was held at Talegaon General Hospital where there is a presence of divinity – do my matches there.

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे वार्ताहर, २९ जुलै.

शुक्रवार दिनांक २८ जुलै रोजी तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये नर्सिंग- जी एन एम कोर्सच्या विद्यार्थिनींना प्रत्येकी रुपये २५००० च्या स्कॉलरशिप वितरणाचा सोहळा संपन्न झाला.अध्यक्षस्थानी होते संस्थेचे अध्यक्ष. गणेश खांडगे- प्रमुख पाहुणे होते मेजर जनरल अभिजीत बापट सर नेव्हीच्या संरक्षण खात्यात कार्यरत असणारे कॅप्टन अनिरुद्ध बापट आणि मेजर जनरल अभिजीत बापट या बंधूंचे आजोबा डॉक्टर भास्कर यशवंत परांजपे १९३० च्या दशकात डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाईच्या समवेत नेत्र रुग्णसेवेसाठी दर रविवारी मुंबईहून तळेगावला येत असत.

त्यांनी अतिशय खडतर स्थितीत आपलं शिक्षण इंग्लंडला पूर्ण केल्यानंतर डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाईंच्या समवेत तळेगावला आपली रुग्ण सेवा रुजू केली होती. आजोबांप्रती असलेली आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या आदरणीय बापट बंधूंनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने दहा लाख रुपये मुदत ठेवीसाठी काही वर्षांपूर्वी तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या खात्यात जमा केले होते. आपल्या आजोबांच्या स्मृती प्रित्यर्थ जमा केलेल्या या ठेवीतील व्याजातून जमा होणाऱ्या रकमेतून दरवर्षी नर्सिंग स्कूलच्या आर्थिक दृष्ट्या कमकुवत पण हुशार असणाऱ्या विद्यार्थिनींना ही स्कॉलरशिप देण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी सोडला होता.

आपले आजोबा डॉक्टर भास्करराव परांजपे सरांची टीजीएच ही कर्मभूमी शोधून काढण्यास त्यांनी खूप परिश्रम घेतले होते हे खरोखरच वाखाणण्यासारखे आहे.यावर्षी तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित जी एन एम नर्सिंग स्कूलच्या प्रथम वर्ष पूर्ण केलेल्या संयुक्ता गंगारकर आणि द्वितीय वर्ष पूर्ण केलेल्या संचिता कुडेकर यांना प्रत्येकी रुपये २५००० ची स्कॉलरशिप सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली.

 

संस्थेचे चेअरमन शैलेशभाई शहा यांनी मेजर जनरल अभिजीत बापट आणि उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत केले. संस्थेचे जेष्ठ संचालक डॉक्टर शाळीग्राम भंडारींनी प्रास्ताविकात संस्थेची यामागील भूमिका व्यक्त करताना बापट बंधूनविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि स्कॉलरशिप प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींच मनःपूर्वक अभिनंदन केलं! संस्थेचे अध्यक्ष. गणेशजी खांडगे संस्थेच्या वतीने आभार मानताना बापट सरांसमोर तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या प्रगतीचा आलेखच सादर केला. संरक्षण खात्यात सेवावृत्तीने कार्यरत असणाऱ्या बापट बंधूंचे विशेष आभार आपल्या मनोगतातून त्यांनी व्यक्त केले.

मेजर जनरल अभिजीत बापट यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना तळेगाव जनरल हॉस्पिटलने हा आमचा संकल्प पूर्णत्वास नेऊन शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विद्यार्थिनींना आर्थिक मदत करण्याची संधी आम्हाला दिली त्याबद्दल त्यांनी संस्थेचे मनःपूर्वक आभार मानलेत!नर्सिंग स्कूलच्या प्राचार्या मोनालिसा मॅडम आणि सीनियर ट्यूटर क्रिस्तीना रणभिसे यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यास विशेष परिश्रम घेतले होते! संरक्षण खात्यात आपली सेवा रुजू करीत असतानाही सामाजिक बांधिलकीच्या नात्याने हे आर्थिक योगदान विद्यार्थिनींच्या उज्वल भविष्यासाठी उपलब्ध करणाऱ्या बापट बंधूंविषयी नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनींची मानसिकता अशीच होती की– दिव्यत्वाची जेथे प्रचिती- तेथे कर माझे जुळती!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!