कृषीवार्ताग्रामीणमावळ

औंढेखुर्द येथील खाडेवाडी मध्ये हांदा पध्दतीने भात लागवड..

औंढेखुर्द येथील खाडेवाडी मधील एका शेतात हांदा पध्दतीने आवणीची कामे काम सुरू केल्याने दोन औतामार्फत केली चिखलणी करताना शेतकरी..

Spread the love

औंढेखुर्द येथील खाडेवाडी मध्ये हांदा पध्दतीने सुमारे पंचवीस माणसे शेतात भातरोपांची खणणी व लागवडीसाठी असल्याने चिखलणी करीता दोन बैलांच्या औतामार्फत चिखलणी करताना शेतकरी..

 आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी,२९ जुलै..

औंढेखुर्द येथील खाडेवाडी मधील एका शेतात हांदा पध्दतीने आवणीची कामे काम सुरू केल्याने दोन औतामार्फत चिखलणी सुरू केली आहे.मजूर मिळेना , भातरोपांची पुरेशी वाढ झाल्याने औंढेखुर्द येथील खाडेवाडी मधील प्रगतीशील शेतकरी व माजी ग्रामपंचायत सदस्य बाप्पू गेणू खाडे यांनी सुमारे पंचवीस शेतकरी महिला व शेतकरी यांचे सहाय्याने आवनीचे कामाला सुरूवात केली आहे.

कामगतीला उशीर होऊ नये म्हणून व चिखलणी वेळेत व्हावे , यासाठी दोन औतामार्फत खाडे यांनी चिखलणी सुरू केली आहे. प्रगतीशील शेतकरी अनंता खाडे , महादू खाडे आणि मधू खाडे यांचेसह सर्व खाडे परिवार या वेळी शेतातमधे भातरोपांची खणणी करताना दिसत आहे.
बाप्पू खाडे यांनी यावर्षी सोनम जातीचे बियाणे लावले आहे. या बियाण्यास चांगला उतारा असून तांदूळ सुवासिक असल्याने या नवीन वाणाची निवड केल्याचे खाडे म्हणाले.

औंढोली , औंढेखुर्द , आपटी , गेव्हंडे , आंबेगाव , सिंदगाव , काले , काॕलनी येथील आवनीचे कामाला भर पावसात जोरात सुरूवात झाली असून काहींच्या आवनीचे कामाची सांगता होऊन कणगा लावून शेतकरी रिकामे झाले असल्याचे चिञ आहे.काहींच्या शेतात भरपूर पाणीपातळी वाढल्यामुळे त्यांचेकडून दमादमाने कामे केली जाणार आहे.एके ठिकाणी मजूर रिकामे झाले की तिकडे मजूर घेऊन कामे केली जातील.

पवनानदीचे पाण्यावर शेतात भातरोपांची उगवण करणा-या नाणेमावळ व पवनमावळ मधील शेतकऱ्यांनी आवनीचे काम उरकून टाकले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!