ताज्या घडामोडी

माध्यमिक विद्यालय वरवडे , वरवडे पंचक्रोशी शिक्षण प माध्यमिक विद्यालय वरवडे येथे विद्यार्थी शिक्षक दिन

Spread the love

माध्यमिक विद्यालय वरवडे ता. जि. रत्नागिरी
वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे संचलित , माध्यमिक विद्यालय वरवडे येथे 
उत्साहात साजरा करण्यात आला . जेष्ठ शिक्षक श्री विचारे सर यांच्या अध्यक्षतेखाली इयता १०वी अ च्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी वर्गअध्यापनाचा आनंद घेतला . महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली जेष्ठ शिक्षक श्री जाधवसर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचालन ८ वी अ मधील आर्या बोरकर हिने केले मुख्याध्यापक म्हणून रुतिक नांदिवडेकर उपमुख्याध्यापक तन्मय पारकर ,पर्यवेक्षक म्हणून तनया मोहीते , लिपीक म्हणून नयना घवाळी , ग्रंथपाल गौरी आंबेरकर यांनी उत्तम कामकाज पाहिले .क्रीडा शिक्षक म्हणून नेहाल जाधव याने ऑर्डर देणे डॉजबॉल खेळ शिकविणे .मैदानात मार्गदर्शन केले . सुजल चव्हाण याने इंग्रजी विषयाचे वर्ग अध्यापन केले तन्मय पारकर याने हिंदी विषय ‘ राज घवाळीने गणित पायल निंबरे हिने इतिहास ,संस्कृत विषय रुतीक नांदिवडेकर तसेच इतर विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिकांची भूमिका उत्तम बजावली पहिल्या ५ तासिका नंतर अल्पोपहार घेतला आणि विद्यार्थीशिक्षक सभा आयोजित करण्यात आली त्यामध्ये सर्वांनी आजचे अनुभव सांगितले विद्यार्थी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर विद्यार्थ्यांनीसुद्धा आपले अनुभव सांगितले या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुजल चव्हाण याने केले. सौ. कदम मॅडम श्री .महाडिक सर श्रीम पवार मॅडम श्रीम गराडे मॅडम श्री . जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिल्या मार्गदर्शन केले शिक्षक दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवले . अध्यक्षीय भाषण आणि आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला . या कार्यक्रमासाठी मा मुख्याध्यापक श्री . देशमुख सर यांनी प्रेरणा दिली .सर्व कार्यक्रमाचे उत्तम नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. कुंभार सर यांनी केले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!