ताज्या घडामोडी

अवैध दारू विक्री बंद होत नाही तोपर्यंत सरपंच आपल्या खुर्चीवर बसणार नाहीत: सागावच्या महिला ग्रामसभेत सरपंचांचा निर्धार

Spread the love

सागावच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच सौ. अस्मिता रवि पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन महिला ग्रामसभेचे आयोजन केले होते.यावेळी गावच्या इतिहासात पहिल्यांदाच दोनशे महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवल्याने महिला ग्रामसभा यशस्वी पार पडली.
या वेळी पिण्याच्या पाण्याची ठराविक वेळेचे फलक प्रत्येक गल्लीत लावणे, महिला स्वच्छतागृहाची व्यवस्था, आठवडा बाजारात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रमुख रस्त्यातील खड्डे बुजवणे, नवीन जलजीवन योजनेतून गावाला मुबलक पाणी देणे, एस टी स्टैंड वर रेडियमचा दिशादर्शक फलक लावणे, घंटागाडीचे नियोजन, सत्संग समाजासाठी जागेची पूर्तता, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी बगीच्या व विरंगळा केंद्र, युवक युवतींसाठी कबड्डी ग्राउंड अशा अनेक विषयावर चर्चा होऊन ठराव झाले.
अनेक महिलांनी गाव डॉल्बीमुक्त झाले पाहिजे अशी मागणी केल्यावर सर्वांनी टाळ्यांच्या गजरात गाव डॉल्बीमुक्त करण्याचे समर्थन केले. इच्छुक गरजूंना प्लॉट मिळण्यासाठी सरपंचाच्या अध्यक्षतेखाली प्लॉट कृती समिती स्थापन करून त्याप्रमाणे प्लॉट वाटप करण्याचे यावेळी ठरले.
यावेळी गावामध्ये अनेक ठिकाणी चोरटी अवैध दारू विक्री चालू आहे. पोलीस प्रशासन यावर नियंत्रण आणण्यात अपयशी ठरले बद्दल सरपंच सौ.पाटील यांनी आपण या दारू विक्रेत्यांना तडीपारीची कारवाईबाबत पोलीस प्रशासनास निवेदन दिले आहे. परंतु त्यांच्यावर कसलीच कारवाई नाही.याचा निषेध म्हणून दिनांक 6 मार्च 2023 पासून सरपंच व उपसरपंच गावातील महिलांसोबत ग्रामपंचायत कार्यालय समोर असलेल्या खुल्या पटांगणात जमिनीवर बसून ग्रामपंचायतचा कारभार करून आत्मक्वेष आंदोलन करतील असे जाहीर केले.यावर उपस्थित सर्व महिलांनी सरपंच घेत असलेल्या धाडसी समाजाभिमुख निर्णयांचे कौतुक करून स्वागत केले.
यावेळी युनियन बँक शाखाधिकारी यांनी बचत गट व व्यवसाय उद्योगधंद्याबद्दल महिलांना चांगले मार्गदर्शन केले तर महावितरण,रेशनिंग धान्य दुकान इत्यादी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी यापुढे महिलांना सन्मान जनक वागणूक दिली जाईल व त्यांचे प्रश्न वेळेत सोडवू असे अभिवचन दिले.दिनांक ८ मार्च २०२३ रोजी होत असलेल्या महिला दिनानिमित्त यशस्वी महिला म्हणून सौ सुनितादेवी मानसिंगराव नाईक यांना निमंत्रित करण्याचे यावेळी सर्वानुमते ठरले.
या ग्रामसभेला उपसरपंच सौ वंदना दीपक पाटील सर्व सदस्य , ग्रामविकास अधिकारी श्री आर डी पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!