महाराष्ट्रसामाजिक

नववर्षाच्या उंबरठ्यावर– दुर्गम डोंगरी भागातील कातकरी बांधवांना नव वस्त्र वितरणातून लायन्स क्लब तळेगावचा मदतीचा हात.

दरवर्षीप्रमाणे लायन्स क्लब तळेगाव आयोजित- पालेगाव- कर्जत येथील आदिवासीना साड्या रेडीमेड कपडे ,स्वेटर व ब्लॅंकेट वितरण मंगळवार दिनांक १२ डिसेंबर २०२३ रोजी संपन्न.

Spread the love

नववर्षाच्या उंबरठ्यावर– दुर्गम डोंगरी भागातील कातकरी बांधवांना नव वस्त्र वितरणातून लायन्स क्लब तळेगावचा मदतीचा हात.,On the brink of New Year- Lions Club Talegaon lends a helping hand by distributing new clothes to Katkari brothers in remote hilly areas.

आवाज न्यूज  : प्रतिनिधी, १८ डिसेंबर.

दरवर्षीप्रमाणे लायन्स क्लब तळेगाव आयोजित- पालेगाव- कर्जत येथील आदिवासीना साड्या रेडीमेड कपडे ,स्वेटर व ब्लॅंकेट वितरण मंगळवार दिनांक १२ डिसेंबर २०२३ रोजी संपन्न. आदिवासींच्या वस्त्रांची गरज भागवण्याचा हा उपक्रम सातत्याने गेली सात वर्ष लायन्स क्लब तळेगाव राबवीत आहे.

— कर्जत तालुक्यातील पाली गाव हे ठिकाण तळेगावहून जवळ जवळ ८० ते ९० किलोमीटर अंतरावर आहे. अतिदुर्गम डोंगराळ भागात वसलेलं हे पाली गाव खरोखरच- स्वच्छ सिमेंटचे रस्ते आणि निसर्गाचं वरदान लाभल्याने अल्हाददायक वाटत होते साधारण तीनशे ते साडेतीनशे लेकुरवळ्या माता-भगिनी! दुर्दैवाने वाट्यास आलेलं वैधव्य स्वीकारणाऱ्या अभागी माता भगिनी! आम्हाला पाहिल्यावर त्या सर्व सभा मंडपात सावरून बसल्या! सर्वप्रथम तेथील सक्षम कार्यकर्ता  अविनाश घाडगे याने आम्हा सर्वांचं हसून मनःपूर्वक स्वागत केल! त्यानंतर लायन अध्यक्ष डॉक्टर अनिकेत काळोखे यांनीही सर्वांच मनःपूर्वक स्वागत करून लायन या आंतरराष्ट्रीय संघटनेचे कार्य- आणि व्याप्ती याविषयीची माहिती अतिशय मोजक्या पण समर्पक शब्दात उपस्थितांना करून दिली.

कातकरी वाड्या वस्तीवर कार्यरत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या  विमल देशमुख यांनी सर्व शासकीय योजनांची माहिती उपस्थित नागरिकांना दिली! या वस्त्र वितरण उपक्रमास- सर्वार्थाने सहयोगी असलेले ह भ प नितीन महाराज काकडेनी प्रास्ताविकात आम्हा लायन परिवाराचा परिचय करून देतानाच या उपक्रमामागील आपली भूमिका स्पष्ट केली! ज्येष्ठ लायन नंदकुमार काळोखेनी आपल्या भाषणात आम्ही हे जे काही आतापर्यंत करीत आलो आहोत ते सर्व आपल्यावर उपकार म्हणून नव्हे तर आमचं परमेश्वरी कर्तव्य म्हणून करीत आहोत हे नम्रपणे त्यांनी व्यक्त केले.

लायन डॉक्टर शालिग्राम भंडारीनी आपलं मनोगत व्यक्त करण्या अगोदरच संपूर्ण स्थानिक कातकरी समाज हा मद्यपानाच्या भोवऱ्यात सापडला आहे याची माहिती घेतली होती! त्या अनुषंगाने- डॉक्टरांनी चांदखेड येथील व्यसनमुक्तीचा यशस्वी केलेला प्रयोग उपस्थितांना सांगून आपल्या संवादास सुरुवात केली!- ज्या कातकरी भगिनीचा पती ज्या संध्याकाळी मद्यपान करून आला असेल तर त्याच्या मद्यपानाची माहिती त्या भगिनीने आपल्या मैत्रिणींना देऊन भर चावडीवर त्या व्यसनाधीन मद्यपिचा चपलेच्या हाराने आणि मारांनी समाचार घ्यावा असा व्यसनमुक्तीचा जालीम उपाय डॉक्टरांनी सांगून आपल्या संवादास सुरुवात केली! त्यानंतर परमेश्वराने आपल्याला अत्यंत निरोगी शरीर आणि निष्पाप निरागस असं संवेदनशील मन दिल आहे त्याची काळजी घ्या! कारण आपलं निरोगी शरीरच आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला साथ देत असत हे आपण कधीच विसरू नका! स्वतःला कधीच कमी लेखू नका कारण आपल्या सारख्याच आदिवासी भिल्ल समाजातील राजेंद्र भारूड नावाचा एक मुलगा आज नांदेड जिल्ह्याचा कलेक्टर आहे त्यामुळे स्वतःला कधीही कमी लेखू नका हा संदेश डॉक्टरांनी आपल्या समारोपाच्या भाषणात उपस्थित कातकरी महिलांना दिला.

त्यानंतर प्रत्येकाला उत्तम प्रकारच्या साड्या ब्लाउज रेडीमेड कपडे आणि ब्लॅंकेट्स याचं वितरण अतिशय नियोजनबद्ध शिस्तीत करण्यात आल! सभागृह सोडणाऱ्या सर्व कातकरी महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद- तृप्तीचे समाधान हीच या समारंभाच्या यशाची पावती होती! झुळझुळ वाहणाऱ्या ओढ्याशेजारी असलेल्या अद्ययावत रिसॉर्टतील सुग्रास भोजनाने या समारंभाची सांगता झाली! हा संपूर्ण समारंभ यशस्वी करण्यास विशेष परिश्रम घेतले होते त्यात– ह भ प नितीन महाराज काकडे ला नंदकुमार काळोखे ला संध्या काळोखे लायन अध्यक्ष डॉक्टर अनिकेत काळोखे लायन प्रियंका काळोखे व हॉटेल शितलचा कर्तव्यदक्ष कर्मचारी वर्ग! स्थानिक कार्यकर्ता  अविनाश घाडगे व त्याची सर्व टीम! वस्त्र वितरण समारंभास– खालील लायन सदस्य उपस्थित होते– लायन महेशभाई शहा- लायन मनोहर दाभाडे- लायन प्रशांत शहा- लायन राजश्री शहा-लायन भरत पोतदार सौ वृंदा पोतदार या सर्वांचही लाख मोलाच सहकार्य या उपक्रमास प्राप्त झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!