क्रीडा व मनोरंजनमावळ

जागतिक मेमरी चॅंम्पिअनशिप २०२३ मध्ये एनएमआयईटीच्या मनीषा गोंधळे परीक्षक म्हणून सहभागी.

Spread the love

जागतिक मेमरी चॅंम्पिअनशिप २०२३ मध्ये एनएमआयईटीच्या मनीषा गोंधळे परीक्षक म्हणून सहभागी.Manisha Ghange of NMIET participated in the World Memory Championship 2023 as an examiner.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १८ डिसेंबर.

ब्रेन इन्फिनिटीद्वारे वाशी नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्रात जागतिक मेमरी चॅम्पिअनशिप २०२३ या स्पर्धेत तळेगाव दाभाडे येथील नूतन इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या समुपदेशक मनिषा गोंधळे यांनी परीक्षक म्हणून स्थान भूषविले. तळेगाव दाभाडे येथील त्या पहिल्या महिला परीक्षक होत्या. या संधीचे श्रेय त्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देवतारे आणि त्यांचे सहकारी यांना देतात. या स्पर्धेमध्ये १३ देशातील ७०० हुन अधिक स्पर्धकांनी सह्भाग नोंदविला तसेच मनिषा गोंधळे यांच्या ९ वर्षाच्या मायरा कुची या विद्यार्थिनीने स्पर्धेत सहभाग घेतला.

भारतातील ही पहिलीच जागतिक मेमरी चॅंम्पिअनशिप होती. इतर खेळासारखाच समरणशक्ती हा एक खेळाचा प्रकार आहे. यामध्ये १० डिसिप्लिन असतात. यामध्ये जास्तीत जास्त शब्द, चित्रे, चेहरे, आकडे, बायनरी लक्षात ठेवण्याची स्पर्धा असते. या खेळाचे पूर्ण प्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देखील मिळत आहे.मनिषा मॅडम ह्या स्वतः एक मेमरी खेळाडू आहेत. त्या वर्ल्ड मेमरी स्पोर्ट कौन्सिल, इंडिया च्या पुणे जिल्हा अध्यक्षा आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि वरिष्ठ यांच्या सहकार्याने मनिषा गोंधळे यांनी महाविद्यालयामध्ये “ब्रेन जिम” ची स्थापना केली आहे. ज्यामुळे मुलांच्या ब्रेनचा सर्वांगिक विकास होतो. मुलांची शिकण्याची शैली – दृश्य. श्रवण आणि क्रियाकलाप यावर “ब्रेन जिम” चा प्रभाव पडतो.

तळेगाव दाभाडे येथील सर्व शाळा आणि कॉलेज यामध्ये मेमरी चॅम्पिअनशिप याचा प्रचार आणि प्रसार करून मेमरी. ॲथलेट घडविणे, तसेच प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयामध्ये “ब्रेन जिम” ची स्थापना करणे हा त्यांचा मानस आहे.” ब्रेन जिम ही काळाची गरज आहे, कारण आपले मोबाईल स्मार्ट होत आहेत पण आपली स्मरणशक्ती कमजोर होत आहे. यावर आताच उपाय शोधणे गरजेचे आहे” असा मानस गोंधळे यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!