पर्यटनमहाराष्ट्रमावळलोणावळा

लोणावळ्यात स्कायवाॕकचे माध्यमातून चिक्की व्यवसायिक , हाॕटेलवाले , टॕक्सीचालक , अॕटोरिक्षा चालक , टपरीवाले , हातगाडीवाले , यांचा तिपटीने व्यवसाय होणार:आमदार सुनिल शेळके यांचे प्रतिपादन.

Spread the love

लोणावळ्यात स्कायवाॕकचे माध्यमातून चिक्की व्यवसायिक , हाॕटेलवाले , टॕक्सीचालक , अॕटोरिक्षा चालक , टपरीवाले , हातगाडीवाले , यांचा तिपटीने व्यवसाय होणार:आमदार सुनिल शेळके यांचे प्रतिपादन. 

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, १७ डिसेंबर.

लोणावळ्यात स्कायवाॕकचे माध्यमातून चिक्की व्यवसायिक, हाॕटेलवाले, टॕक्सीचालक, अॕटोरिक्षा चालक, टपरीवाले, हातगाडीवाले, यांचा तिपटीने व्यवसाय होणार, त्यामुळे लोणावळा व मावळात पर्यटनाला चालना मिळेल, असे मावळचे कार्यसम्राट आमदार सुनिल शेळके यांनी लोणावळ्यात भव्यदिव्य नागरी सत्काराला उत्तर देताना प्रतिपादन केले.गवळीवाडा नाका, भगवान महावीरचौक, मावळा पुतळा येथे काँग्रेस, शिवसेना, आणि राष्ट्रवादीचे, भाजपचे पदाधिकारी यांचे सत्कार स्विकारत ढोललेझीमचे तालात मिरवणुकीने छञपती शिवाजी महाराज चौकात आमदार सुनिल शेळके आले. तेथे छञपतीँच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालून उतरत असताना सकल मराठा समाजाचा गरजवंत मराठ्यांचे साखळी उपोषणात कुसगाव बुद्रूक विभागातर्फे चालू असलेल्या उपोषणकर्ते यांनी मनोजभाऊ जरांगे पाटील यांचे नावाची घोषणा व आरक्षण आमच्या हक्काचे ! नाही कुणाचे बापाचे । अशा घोषणा दिल्या.

यावेळी आमदारांनी माईक हातात घेत छञपतीँच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आपण सकल मराठा समाजाचे सदैव पाठीशी आहोत. गरीब, सर्वसामान्य घरातील मराठी बंधू भगिनींना आरक्षण चे माध्यमातून रोजगार व शिक्षणाचा हक्क मिळू शकतो. हिवाळी आधिवेशन ता.३०पर्यत असून मनोज जरांगे पाटील यांचे मागणीनुसार ता.२४ पर्यत मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्त्न आहे.तो यशस्वी होवो.आरक्षण मिळो.आम्ही सदैव पाठीशी आहोत, असे ते म्हणाले.

यावेळी ते पुढे आल्यावर क्रेनच्या सहाय्याने एक शंभर किलोचेवर फुलांचा हार आमदार.शेळके यांना सर्वपक्षिय पदाधिकारी यांनी घातला. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वाळंज, तालुका कार्याध्यक्ष दिपकशेठ हुलावळे, शहराध्यक्ष विलासभाऊ बडेकर, माजी नगरसेवक राजूशेठ बच्चे, माजी शहराध्यक्ष जीवन गायकवाड, आणि सुरेश कडू, ग्रामिण भागातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना  शेळके म्हणाले , आंदरमावळासाठी कान्हे ते सावळा ४३ किलोमीटर रस्त्याचे कामाला ३२८ कोटी निधी मंजूर केला आहे.एमटीडीसी जवळ सुमारे ८५-ते ९०कोटीचा प्रकल्प उभा राहत आहे.कार्ला येथे आई श्रीएकविरा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी यासाठी रोप वे रस्ते रूंदीकरण सुसज्ज भक्तनिवास यासाठी  सव्वासाशे कोटी मंजूर केलेले आहेत.

विकास कामे करताना जमिनी संपादित केल्या जातात.त्यामुळे यामागे गावोगावी शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या.लग्न समारंभ झाले.आता बास जमिनी विकू नका. जमिनीचा तुकडा आहे तो जपून ठेवा.काही लोक म्हणतात, ग्लासवाॕक मुळे काय फायदा होणार ! मी म्हणतो, याठिकाणी व्यासपीठावर आला, तर तुंम्हाला चांगले उत्तर देता आले असते.जिल्हा रूग्णालयाबद्दल बोलताना आमदार.शेळके म्हणाले, हाॕस्पिटलचे करीता नुसता ठोकळा उभा करून उपयोग नाही.फाईव्ह स्टार हाॕस्पिटलचे काम होणार आहे.कान्हेफाटा येथेही असेच फाईवस्टार हाॕस्पिटलचे काम व वडगावला नगरपंचायत, ईमारतही अशीच होणारआहे.

टायगर व लायन्स पाँईंट येथील स्कायवाॕक बाबत शेळके म्हणाले, या प्रकल्पाबाबत आर्किटेक्ट शब्बीरभाई यांना बोललो, चांगले डिझाईन बनवा.त्यांनी शंभर कोटीपर्यत बनवले. थ्री डी प्रकल्प ,काढून द्या. त्यांनी या कामाचा बनवला, मी उपमुख्यमंञी अजितदादा यांचेकडे गेलो.तेथे अधिकारी यांची त्यांनी बैठक घेतली. मंजूर हौणार, तर सरकार पडले.विरोधी पक्षातकामे होईना. सुदैवाने पुन्हा सरकारमध्ये आलो. हा प्रकल्प मावळचे जनतेसाठी उपमुख्यमंञी अजितदादा पवार यांनी अधिकारी यांची बैठक लावली.पुन्हा एस्टीमेंट काढले..ते ३३३.५६कोटीवर गेले. मी त्यावेळी आधिकारी यांना बोललो.दादांनी द्यायचे ठरवले  तिथे पुणे जिल्ह्यात या सुनिल शेळके व मावळच्या जनतेकडे पाहून,  त्यांनी हा वाढीव खर्चाचा निधी भुशीगाव ते टायगर पाँईंट पर्यतचा रस्ता रूंदीकरण, जमिनी खरेदीसाठीच शंभर कोटी लागणार आहे.त्या स्कायवाॕक मधे झुला, जंम्पींग, दोन तीन हजार वाहनांचे करीता पार्कींग व्यवस्था , हे सर्व आले.छञपती शिवाजी महाराज स्मारक महिनाभरात काम मार्गी लावतो.जनरल मोटर्स कामगारांचा प्रश्न व पवना धरणग्रस्थ यांच्या मागण्यांसाठी तीन दिवसांत मार्ग काढतो, असे आमदार.शेळके म्हणाले.व्यासपीठावर आल्यावर दिपप्रज्वलन व छञपतीँच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मान्यवरांनी विचार मांडले.

प्रास्ताविक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष विलासभाऊ बडेकर यांनी केले.बडेकर म्हणाले,मावळचे कार्यसम्राट आमदार यांनी सुमारे १०१कोटीपेक्षा जास्त निधी आणला, ते सभा, विवाहाला जरी नाही उपस्थित राहिले तरी चालेल, विकासकामे यांना प्राधान्य द्यावे.यावेळी माजी नगरसेवक जीवन गायकवाड म्हणाले, येथे जमिनीचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य टपरीचालक ,जमिन घेऊ शकत नाही.तुंगार्ली डॕमजवळ ८०एकर जागा आहे. तेथे प्रकल्प उभारा.राजमाची गार्डनसमोर तीस एकर जागा ताब्यात आहे, तिथेही मिनिस्कायवाॕक व रोपवे केला पाहिजे.खंडाळा तलावाचे रखडलेले कामाकडे लक्ष द्यावे.

माजी नगरसेवक.कविश्वर म्हणाले  मी छञपती शिवाजी महाराज यांचे स्मारकासाठी उपोषणाला बसलो  तेव्हा आपण आला होता.ते पाच ते सहा कोटीचे काम गृहीत धरले आहे. टायगर पाॕईंट ला स्कायवाॕक, झुला, अँम्पी थिएटर होणार आहे.असे दूरदृष्टी ने प्रकल्प आणले त्याबद्दल आभारी आहे.
माजी शिवसेनाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांनी शिवाजी उद्यानमधे लेजर शो व्हावा.लोक दरीजवळ सेल्फी काढतात , गाडीसह काढतात अन गाडीसह दरीत पडतात.हे चुकीचे आहे.या शहरातील नगराध्यक्ष व नगरसेवक यांना काही देणेघेणे नाही.
एथे एसपी लक्ष्मीनारायण असताना व पोलिसनिरिक्षक सुभाष जाधव असताना सकाळी सात ते राञी नऊ शहरातून अवजड वाहतूक बंद करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो होतो.परवा अवजड वाहन पलटी होऊन तीन चार निष्पाप लोकांचा बळी गेला. हे कुठेतरी थांबले पाहीजे.
शहरात नगराध्यक्ष, राज्यात मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एकाच पक्षाचा असूनही भांगरवाडी नांगरगाव पूल का होत नाही ?

मावळा पुतळा ते छञपती शिवाजी महाराज चौक रस्त्याचे आतील जागा रेल्वेच्या मालकीच्या असताना, नगरपरिषदेकडे का घेतली जात नाही, पार्कींग ची समस्या, वाहतूक कोंडी होणार नाही, टाटालेक जवळही असेच काही होऊ शकते, पण कोणी मनावर घेत नाही.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी लोणावळेकर नागरिकांकडून आमदारांचे कार्याबद्दल भरभरून प्रेम व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद देत असेच पक्षभेद विसरून सर्वांनी चांगल्या कामात एकञ यायला हवे, हे लोणावळाचे लोकांकडून शिकण्यासारखे आहे, असे आपल्या भाषणात म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!