आरोग्य व शिक्षणमावळ

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि इंद्रायणी विद्यामंदिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थीनींसाठी मोफत रुबेला प्रतिबंधक लसीकरण’ कार्यक्रम संपन्न.

१५/१२/२०२३ रोजी श्रीराम विद्यालय, नवलाख उंब्रे आणि शनिवार १६/१२/२०२३ रोजी संत तुकाराम विद्यालय शिवणे या ठिकाणी संपन्न झाला.

Spread the love

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि इंद्रायणी विद्यामंदिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थीनींसाठी मोफत रुबेला प्रतिबंधक लसीकरण’ कार्यक्रम संपन्न.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १६ डिसेंबर.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि इंद्रायणी विद्यामंदिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आपण शुक्रवार १५/१२/२०२३ रोजी श्रीराम विद्यालय, नवलाख उंब्रे आणि शनिवार १६/१२/२०२३ रोजी संत तुकाराम विद्यालय शिवणे या ठिकाणी ‘शालेय विद्यार्थीनींसाठी मोफत रुबेला प्रतिबंधक लसीकरण’ कार्यक्रम पूर्ण केला.

या दोन्ही शाळा मिळून एकूण २४९ विद्यार्थिनींना लसीकरण केले गेले. अध्यक्ष उद्धव चितळे,उपाध्यक्ष कमलेश कार्ले,सचिव श्रीशैल मेन्थे यांच्या पुढाकारातून युथ डायरेक्टर व प्रकल्प प्रमुख रो युवराज काकडे यांच्या विशेष सहकार्यातून व डॉ नेहा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पार पडला.मुलींना लस देण्यापूर्वी पुन्हा एकदा त्यांना रुबेला संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन, इंद्रायणी विद्यामंदिर संस्था आणि क्लब चे अध्यक्ष रो. उद्धव चितळे, सचिव रो. श्रीशै्ल मेंथे, रो . प्रमोद दाभाडे, अर्चनाताई चितळे, भाग्यश्री काकडे, मेडिकल डायरेक्टर डॉ. ज्योती मुंदर्गी, डॉ. नेहा कुलकर्णी, TGH Onco Life यांची मेडिकल टीम आणि रो.राजू गोडबोले यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!