ग्रामीणमावळसामाजिक

ताजे गावातील महिलांचे डोक्यावर आजही तीन हंड्याची दूड.  

Spread the love

ताजे गावातील महिलांचे डोक्यावर आजही तीन हंड्याची दूड.Even today, the women of Taje village still have three heads on their heads.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, १६ डिसेंबर.

ताजे गावातील महिलांचे डोक्यावर आजही तीन हंड्याची दूड असून हातपंपाने पाणी भरण्यासाठी पहाटेपासूनच गर्दी होताना दिसते.नदी पायथ्याला आणि कोरड घशाला, अशी म्हणच येथे उपयोगात येईल, अशी सध्या परिस्थिती दिसते.
नळपाणी योजना आहे, पाथरगाव, ताजे, पिंपळोली ग्रूपग्रामपंचायतचे वतीने इंद्रायणीनदीवर ही योजना सुरू आहै,पण नियमितपणे दररोज सोडा दिवसाआड पाणीही या माता भगिनींना मिळत नाही. त्यामुळे पिण्यासाठी , जनावरांच्या करीता कपडेलत्ते, भांडी धुणे आणि जेवण बनविणे यासाठी किमान माणसी एकशे चाळीस लीटर पाणी रोज मिळणे गरजेचे असताना, सुमारे आठ ते पंधरा दिवसांनी पाणी मिळते.असे येथील हातपंपावर पाणी भरणा-या महिलांनी आवाज प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

ताजेवरून पाथरगाव , कामशेतकडे जाणाऱ्या रस्त्याचे बाजूलाच हा हातपंप असून या हातपंपावर पहाटेपासूनच सकाळी दहा ते दुपारी बारा एक पर्यत महिलांची गर्दी पाणी भरताना दिसून आली. काही तीनतीन हंडे असलेल्या महिला, सकाळी सातआधीच पाणी भरून गेल्याने, आंघोळीसाठी लागणारे पाणीही महिलांना भरावे लागत असल्याचे चिञ दिसून आले.

काही गावात रोज, काही गावात दिसाड, काही ग्रामपंचायतीचे हद्दीत दोन दिवसांनी, औंढोली, औंढेखुर्द ग्रामपंचायतीचे हद्दीत गावाचे तीन ठिकाणी वाॕल बसविल्याने प्रत्येक भागाला पूर्ण प्रेशरने तीन, चार दिवसांनी पाणी मिळते. पण ते पुरवठ्याचे असते.ताजे गावाला माञ आठ ते पंधरा दिवसांनी मिळणारे पाणी इंद्रायणी नदी जवळच पायथ्याशी असूनही मिळत नसल्याने महिलांनी रोज किंवा दिवसाआड पाणी सोडावे, अशी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!