आरोग्य व शिक्षण

अनाधिकृत भाजी विक्रेते व पथारीवाले यांना न हटवल्यास आंदोलनाचा इशारा

Spread the love

तळेगाव : येथील शर्मा कॉम्प्लेक्सच्या पूर्व व उत्तर बाजूस बसणाऱ्या अनधिकृत भाजी विक्रेते व पथारीवाले यांना नगरपरिषदेने न हटवल्यास आंदोलनाचा इशारा शर्मा कॉम्प्लेक्स, शुभम कॉम्प्लेक्स व बालाजी कॉम्प्लेक्स व्यापारी संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे.

संघटनेच्या वतीने अँड. रवींद्र दाभाडे, रवींद्र आवारे, कैलास भेगडे, निलेश दाभाडे यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी सतीश दिघे यांना याबाबत निवेदन दिले आहे.

20 मार्च 2020 पासून नगरपरिषदेने या परिसरातील भाजी मंडई कायमस्वरूपी बंद करून इंद्रायणी कॉलेज शेजारी नव्याने वसवून भाजीवाले व फळवाले यांचे पुनर्वसन केले आहे.

संघटनेच्यावतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी  यांना दिलेल्या निवेदनात भाजीपाला विक्रेते व पथारीवाले शर्मा कॉम्प्लेक्सच्या रस्त्यावर विनापरवाना बसत असून त्यांनी दुकानांच्या पार्किंगची जागा पूर्णपणे अडविलेली आहे. यामुळे दुकानदारांना स्वतःची गाडी पार्क करण्यासाठी जागा मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.

तसेच येथील ग्राहकांच्या गर्दीमुळे तळेगाव चाकण राष्ट्रीय महामार्गाची कोंडी होत असून भाजी विक्रेते व पथारीवाले यांच्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.भाजीवाले व ग्राहक सोशल डिस्टंसिंगचे पालन करताना दिसत नाही तसेच मास्कचा वापर करत नाही त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे असे निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनाची प्रत पुणे जिल्हाधिकारी, पोलिस निरीक्षक तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन व उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वडगाव मावळ यांना देण्यात आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!