क्रीडा व मनोरंजनमावळसामाजिक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सरस्वती विद्यामंदिर येथे विविध उपक्रम साजरे..

शिवाजी चौकात, इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी 'आ चंद्र सूर्य नांदो ','उठा राष्ट्रवीर हो' 'बलसागर भारत होवो' ही देशभक्तीपर गीते सादर केली.

Spread the love

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सरस्वती विद्यामंदिर येथे विविध उपक्रम साजरे..Various activities are celebrated at Saraswati Vidya Mandir on the occasion of Amrit Mahotsav of Independence.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ९ ऑगष्ट.   

सरस्वती विद्यामंदिर तळेगाव दाभाडे येथे बुधवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांच्या वेशभूषा केल्या होत्या .त्यांची माहिती इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सांगितली. सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष. सुरेश झेंड, उपाध्यक्ष. दिलीप कुलकर्णी ,सदस्य. विश्वास देशपांडे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका. रेखा परदेशी ,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक. नवनाथ गाढवे, बालवाडी विभाग प्रमुख सोनाली काशीद यांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करण्यात आले.

यानंतर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी राज्य गीत सादर केले. ‘मेरी माटी मेरा गाव’ अंतर्गत  संजय गायकवाड सर यांनी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली व पंचप्राण अंतर्गत बालवाडी ते माध्यमिक विभागाच्या सर्व शिक्षकांनी हातात दिवे घेतले व विद्यार्थ्यांनी हातात माती घेऊन शपथ घेतली.

त्यानंतर यशवंत नगर परिसरातून इयत्ता पाचवी ते दहावीच्या सहाशे विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली. रेल्वे स्टेशन येथे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी राज्य गीत ,इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी’ नन्ना मुन्ना राही हु ‘इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘आ चंद्र सूर्य नांदो ‘ही देशभक्तीपर गीते सादर केली व शिवाजी चौकात इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी ‘आ चंद्र सूर्य नांदो ‘,’उठा राष्ट्रवीर हो’ ‘बलसागर भारत होवो’ ही देशभक्तीपर गीते सादर केली.

परिसरातून फेरी काढत असताना विद्यार्थ्यांनी ‘करेंगे या मरेंगे’, ‘मेरी झाशी नही दूंगी’, ‘जय हिंद’, ‘भारतीय स्वातंत्र्याचा विजय असो ‘,तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा’ ,’जय जवान जय किसान जय विज्ञान ‘ अशा घोषणा दिल्या .या फेरीसाठी तळेगाव पोलीस स्टेशनचे  वाबळे सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तम सहकार्य केले याबद्दल सरस्वती शिक्षण संस्थेतर्फे त्यांचे हार्दिक आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!