मावळसामाजिक

औंढेखुर्द येथील पुलाजवळ दगडगोटे निसटून पडू नयेत , यासाठी लोखंडी जाळी बसविण्याचे काम युध्दपातळीवर.

Spread the love

औंढेखुर्द येथील पुलाजवळ दगडगोटे निसटून पडू नयेत, यासाठी लोखंडी जाळी बसविण्याचे काम  युध्दपातळीवर.The work of installing iron mesh near the bridge at Aundhekhurd is on a war footing to prevent stones from falling.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर,  लोणावळा प्रतिनिधी ९ ऑगष्ट.

औंढेखुर्द येथील पुलाजवळ दगडगोटे निसटून पडू नयेत , यासाठी लोखंडी जाळी बसविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. येथील आरूंद पुलावरून सध्या दळणवळण सुरू असून एके दिवशी याच पुलाजवळचा लोखंडी कठडा एका लांबलचक कंटेनरमुळे तुटून कंटेनर चे चाक खाली लोंबकळले होते, सुदैवाने यात कोणीही जखमी वा जीवितहानी झाली नाही.

येथील कठडा दिवसभर राज्य रस्ते महामंडळ लोकांची एक टीम आली. दिवसभर काम करून त्यांचेकडून तो कठडा बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले.
गेली काही दिवस या सुटणारे व डोंगरालगत असलेल्या दगडाचेवर डोंगरावरील भागात यंञाने बोरींगमशीनद्वारे छिदे पाडणे व खालील बाजूने क्रेनने छिद्र पाडणे ही कामे सुरू असून त्यामध्ये सळयाच्या सहाय्याने ते भरून घेत त्यात राॕड टाकून भक्कम करीत जाळी बसविण्याचे काम जोरात चालू आहे.

लोणावळा पवनानगरला , औंढेखुर्द , औंढोली मार्गे जो पूल होणार आहे त्याचे काम माञ अद्याप सुरू झालेले नाही.
माजी सरपंच अर्जून पाठारे यांनी गावातील कार्यकर्त्याना घेवून पीएमआरडीए कडे पाठपुरावा केला.ग्रामस्थांच्या वतीने दोनवेळा आंदोलने करण्यात आली.माञ अद्याप पुलाचे पिलर उभारलेले नाही. किंवा तशी हालचाल नाही. कदाचित् अतिशय पाऊस असल्याने सध्या मधल्या रस्त्याच्या बंद सहा लेनवरील माती , सिमेंट कामाचा राडारोडा उचलण्याचे काम सुरू आहे.

या भागात लोणावळा पवनानगरला जाणारा रस्ता मुंबई पुणे द्रूतगतीमार्गावर उड्डाणापूल उभारून सर्वसामान्यपणे नागरिकांची सोय करावी, व हा आढेवेढे घालायला लावणारा मार्ग बंद करावा, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!