क्रीडा व मनोरंजन

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा जाहीर

Spread the love

राष्ट्रीय प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक आणि फिजिओ यांची घोषणा

क्रीडा प्रतिनिधी बाळ तोरसकर

मुंबई, २ जून, (क्री. प्र.) : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने २०२२-२३ या वर्षासाठी सर्व गटांच्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा जाहीर केल्या आहेत. याचबरोबर महाराष्ट्र खोखो संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक आणि फिजिओ यांची घोषणा सुध्दा महाराष्ट्र खोखो असोसिएशनचे सेक्रेटरी गोविंद शर्मा यांनी जाहीर केल्या आहेत. गेल्यावर्षी महाराष्ट्राच्या सहापैकी पाच गटांनी राष्ट्रीय अजिंक्यपद मिळवले होते. या सर्व बाबींचा विचार करून वर्षाच्या सुरुवातीलाच सर्व संघांचे राष्ट्रीय प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक आणि फिजिओ यांची घोषणा केली आहे.

याच बरोबर किशोर किशोरी (सब जूनियर – १४ वर्षाखालील) राज्य अजिंक्यपद स्पर्धा रत्नागिरी तेथे सेप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेणार असल्याचे निश्चत केले आहे. पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद स्पर्धा हिंगोली येथे नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात घेणार असल्याचे निश्चत केले आहे. तर डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात रायगड येथे कुमार व मुली (जूनियर – १८ वर्षाखालील) राज्य अजिंक्यपद स्पर्धा घेणार असल्याचे महाराष्ट्र खोखो असोसिएशनचे सेक्रेटरी गोविंद शर्मा यांनी जाहीर केले आहे.

पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा
पुरुष (खुला गट)
प्रशिक्षक – श्री. शिरीन गोडबोले, पुणे
फिजिओ : – डॉ किरण वाघ , अहमदनगर

महिला (खुला गट)
प्रशिक्षक – श्री प्रवीण बागल, उस्मानाबाद
सहा. प्रशिक्षक – सौ. प्राची वाईकर , पुणे

फेडरेशन चषक पुरुष व महिला राष्ट्रीय स्पर्धा
पुरुष (खुला गट)
प्रशिक्षक – श्री संतोष कर्नाळे , सांगली
फिजिओ – डॉ. किरण वाघ, अहमदनगर

महिला (खुला गट)
प्रशिक्षक – श्री विकास सूर्यवंशी, औरंगाबाद
सहा . प्रशिक्षक : – श्री राजेश कळंबटे, रत्नागिरी

कुमार व मुली (जूनियर – १८ वर्षाखालील) राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा
कुमार (जूनियर – १८ वर्षाखालील)
प्रशिक्षक – श्री. सोमनाथ बनसोडे, सोलापूर
फिजिओ : – डॉ . अमित राव्हटे , सांगली

मुली (जूनियर – १८ वर्षाखालील)
प्रशिक्षक – श्री श्रीकांत गायकवाड , मुंबई
सहाय्यक प्रशिक्षक – श्री राहुल पोळ, जळगाव

किशोर किशोरी (सब जूनियर – १४ वर्षाखालील) राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा
किशोर (सब जूनियर – १४ वर्षाखालील)
प्रशिक्षक – श्री प्रफुल हाटवटे, बीड
फिजिओ : – डॉ . अमित राव्हटे, सांगली

किशोरी (सब जूनियर – १४ वर्षाखालील)
प्रशिक्षक – श्री. अमित परब, ठाणे
सहा. प्रशिक्षक – श्री. रफिक शेख, जालना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!