ताज्या घडामोडी

इस्लामपूर येथे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते आरोग्य मेळाव्याचे उदघाटन.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

इस्लामपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंर्तगत उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर येथे मोफत तालुकास्तरीलय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन सांगली जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आमदार नाईक म्हणाले, तालुक्यातील ज्या नागरिकांना आरोग्याच्या अडचणी जाणवत आहे, अशा सर्वांनी या शिबिराला लाभ घ्यावा. शिबीरात सहभागी होऊन युवकांनी रक्तदान करावे. वयस्कर व्यक्तीनी हाडांचे आजारावरील उपचार, तर मुधमेही व उच्चरक्तदाब असणाऱ्यांनी तपसणी करुन घ्याव्यात. या शिबिरात विशेषतः महिलांच्या सर्व आजारावरील तपासणी व उचार केले जाणार आहेत. त्यामुळे महिलांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा. उद्घाटन समारंभावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, वैद्यकिय अधिक्षक डॉ. नरसिंह देशमुख, वैद्यकिय अधिकारी डॉ. अशोक शेंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. ठोंबरे, डॉ. चौगुले, डॉ. भंडारी, डॉ. चौगुले, उप जिल्हा रुग्णालयाचा सर्व स्टाफ, वाळवा तालुक्यातून आलेल रुग्ण, नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!