आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर सेलची कार्यकारिणी जाहीर..

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर सेलचे अध्यक्ष अविनाश बधाले यांनी पदवीधर सेलची कार्यकारणी आमदार सुनिल शेळके व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या उपस्थितीत जाहीर केली.

Spread the love

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर सेलची कार्यकारिणी जाहीर..

आवाज न्यूजः वडगाव मावळ, १५ सप्टेंबर. 

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर सेलचे अध्यक्ष अविनाश बधाले यांनी पदवीधर सेलची कार्यकारणी आमदार सुनिल शेळके व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,  यांच्या उपस्थितीत जाहीर केली. या कार्यकारणीतील पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. पदवीधर सेलचे अध्यक्ष अविनाश बधाले यांनी जाहीर केलेल्या व नियुक्तीपत्र दिलेल्या पदाधिकारी पुढील प्रमाणे.

या कार्यकारणीत अक्षय जाधव (उपाध्यक्ष), कल्पेश आंबेकर (उपाध्यक्ष ), कृष्णा भंडारी (सरचिटणीस), कैलास भोईर ( सचिव),गौरव शिंदे ( अंदर मावळ अध्यक्ष ), मयूर पारीठे ( अंदर मावळ उपाध्यक्ष), विकास गायकवाड (नाने मावळ अध्यक्ष ),अमित ठाकर (पवन मावळ अध्यक्ष ), सौरभ सावले (वडगाव शहर अध्यक्ष), संदीप बहोत (देहूरोड शहर अध्यक्ष )

आनंदा टिळेकर (देहू शहर अध्यक्ष), ऋषिकेश जाधव ( लोणावळा शहर अध्यक्ष ) यांची वर्णी लागली. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठलराव शिंदे, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष किशोर सातकर यांच्या सह पक्षाचे नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मावळ भागातील व शहरातील पदवीधर असलेल्या कार्यकर्त्यांची पदवीधर सेल मध्ये समावेश करून पक्ष संघटना मजबूत करणार असल्याचा विश्वास मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर सेलचे अध्यक्ष अविनाश बधाले यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!