ताज्या घडामोडी

मनिषा कडव अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित….!

Spread the love

प्रतिनिधी-लक्ष्मण राजे

मुंबई – आमदार मा.श्री. प्रकाश सुर्वे (मागाठाणे विधानसभा) यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक महोत्सव – २०२२ अक्षर साहित्य व कला मंच, शिक्षक नेते श्री.एस.ए. शेंडगे मल्टीपर्यज निधी बैंक लि. (मुंबई), चारकोप-गोराई शिक्षक संघ तसेच अखिल भारतीय शिक्षक कल्याण संकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २३ एप्रिल २०२२ शुभम पार्टी हॉल, गणेश चौक, चारकोप, कांदिवली (प.) येथे आयोजित करण्यात आला होता. या शिक्षक महोत्सवात शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल डी.एस. हायस्कूल, सायनच्या ग्रंथपाल सौ.मनिषा राजन कडव यांना सन २०२२ चा पुण्यश्लोक राष्ट्रमाता महाराणी अहिल्याबाई होळकर कर्तृत्ववान आदर्श महिला पुरस्कार मा.श्री. प्रकाशदादा सुर्वे आमदार / मागाठाणे विधानसभा यांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळीप्रमुख मार्गदर्शक श्री. विपुल दोशी समाज सेवक, श्री. दिनेश गायकवाड सर ,श्री. शिवाजी शेंडगे सर,सौ. संध्या विपुल दोशी मा.नगसेविका/ शिक्षण समिती अध्यक्ष , आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!