ताज्या घडामोडी

प्रा. सुजित मठकरी यांना रसायनशास्त्र विषयात पीएच. डी. पदवी

Spread the love

मुरुम, ता. उमरगा, ता. २४ (प्रतिनिधी)

येथील माधवराव पाटील महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागात कार्यरत असणारे प्रा. सुजित शशिकांत मठकरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नुकतीच पीएच. डी. पदवी प्राप्त झाली आहे. त्यांनी ” स्ट्रक्चरल अँड इलेक्ट्रो केमिकल स्टडी ऑफ डोपड (ग्रु.३ अ व ८) सीडीएसई थिन फिल्मस ” या विषयावर विद्यापीठात प्रबंध सादर केला होता. त्यांना घनसांवगी येथील संत रामदास कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर संशोधन कार्य पूर्ण केले होते. नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संचालक डॉ. डी. व्ही. माने यांनीही त्यांना सहकार्य केले. बाहय परिक्षक म्हणून धुळे येथील एस. एस. व्ही. पी. महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर. जी. महाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम. के. लांडे हे या ऑनलाईन मौखिक परीक्षेच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. पीएच. डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील, नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. राजकुमार रोहीकर, प्रा. डॉ. अप्पासाहेब सुर्यवंशी, डॉ. रवि आळंगे, डॉ. सुशील मठपती, डॉ. जयश्री सोमवंशी, डॉ. सुभाष हुलपल्ले, प्रा. सचिन राजमाने, प्रा. लक्ष्मण पवार, प्रा. भूषण पाताळे, प्रा. अंकुश टाकळे आदींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!