महाराष्ट्र

कसारवडवली पोलीस ठाण्यामध्ये “भीम जयंती” चा कार्यक्रम उत्साहात

Spread the love

आपल्या शासकीय कामाची जबाबदारी पार पाडून कासार वडवली पोलीस ठाण्यात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ भीमराव रामजी आंबेडकर यांची 131 वी जयंती अत्यंत सुसुत्र पद्धतीने संपन्न झाली. यावेळी (झोन ५) चे डीसीपी मा.आयु. डॉ. विनय राठोड साहेब,व वरिष्ठ पोलीस नीरीक्षक मा.आयु. राजेश बाबशेट्टी साहेब, यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व दीपप्रज्वलन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले, डीसीपी डॉ विनय राठोड आपल्या भाषणात म्हणाले की बाबासाहेबांचे संविधान हे सर्वानी आत्मसात केले पाहिजे, त्यांनी लिहून ठेवलेली घटना ही चिरकाल टिकणारी आहे, सर्वाना समान अधिकार दिले आहेत असे ते म्हणाले, तर वरिष्ठ पोलीस नीरीक्षक मा.आयु. राजेश बाबशेट्टी साहेब म्हणाले की,बाबासाहेबांच्या घटनेत सर्वांना मुल्ये आणि अधिकार दिली आहेत त्याचा सुयोग्य वापर केला पाहिजे, तरच कायदा व सुव्यवस्था टिकून राहिल, तसेच एसीपी मा. आयु. नीलेश सोनावणे साहेब यांनी डॉ. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले, पोलीस नीरीक्षक मा. आयु.शशिकांत रोकडे व आयु.लोखंडे साहेब यांनी ही मार्गदर्शन करून बाबासाहेबाना अभिवादन केले. यावेळी “बुद्धीस्ट वेलफेअर असोसिएशन ब्रम्हांड चे अध्यक्ष बौद्धाचार्य आयु. चंद्रकांत माने यांनी थोडक्यात पण फार मार्मिक असे सांगितले की, बाबासाहेबांनी केवळ घटनाच नाही तर शेतकर्यांच्या समस्या असोत, पाणी प्रश्न असो किंवा सर्व कर्मचार्यांना 8 तासाचे काम आणि महिलांना बालसंगोपन रजा यांची तरतूद बाबासाहेबांनी करून ठेवली आहे, असे ते म्हणाले,कार्यक्रमाला स्थानिक नगरसेवक आयु. मा. सिद्धार्थ ओवळेकर यांनी भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. आयु. श्रध्दा पाटील मँडम यांनी रांगोळी काढून परीसर सुशोभित केला. तर सदर कार्यक्रमात उपस्थित मान्यवर व सर्वांना भारतीय संविधानाच्या प्रती देऊन एक स्तुत्य उपक्रम कासार वडवली पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सपकाळे साहेबानी केला,यावेळी स्पर्श फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आयु. महेंद्र देशमुख, वेलफेअर चे सचिव. प्रा. अनिल आठवले, व सभासद आयु. जितेंंद्र जगताप, आयु. राजेश साळुंखे, वेलफेअर महिला सदस्य,आयुष्यमती विश्रांती माने, आयुष्यमती ज्योती शिंदे, “बुद्ध धम्म संस्कार संस्थेचे (BDSS) पदाधिकारी आयु. मच्छिंद्र तीगोटे सर, आयु. जयकुमार घोडके सर,आयु. विजय गडलिंग सर आयु. संतोष गायकवाड सर,आयु. महेंद्र मोटघरे सर, आयु. परमेश्वर भालेराव सर, आयु. सुमेध शेंडे सर, आदी मान्यवरांनी उपस्थितीत राहून बाबासाहेबांना अभिनंदन केले, तसेच कासार वडवली पोलीस कर्मचारी वर्गानिही उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले, या वेळी वेलफेअर चे सचिव प्रा. अनिल आठवले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय सुंदर रितीने केले.व कार्यक्रमाचे अतिशय सुंदर नियोजन व आयोजन PSI.आयु. सपकाळे साहेब, APIआयु. लोखंडे साहेब यांनी केले. शेवटी कासार वडवली पोलीस ठाणे यांनी स्नेहभोजनाचे उत्तम आयोजन केले होते. कासारवडवली पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!