ताज्या घडामोडी

अम्रूता घुगरेला “उत्कृष्ट गायिका ” पुरस्कार प्रदान

Spread the love

प्रतिनिधी. कवी सरकार इंगळी

कोल्हापुर जिल्हा लोककलाकार संघाचेवतीने घेण्यात आलेल्या ऊत्तूर ता. आजरा येथे भव्य कलामहोत्स्वात “ऊत्क्रूष्ठ गायिका पुरस्कार” कुडूत्री ता. राधानगरी येथील कु. अम्रूता बळवंत घूगरे हिला राज्याचे ग्रामविकास मंत्री नाम. हसन मुश्रीफ यांच्या शुभ हस्ते गौरविण्यात आले.
कु. अम्रूता घुगरे हि गौरव माय मराठीचा कसबा तारळे या सांस्कृतिक कार्यक्रमात व कुडूत्री आणी परिसरामध्ये भजन गायनाचा कार्यक्रम करत आहे. तिचा आवाज गोड आणी सुमधूर आहे.
लोककलाकार संघाचेवतीने संस्थापक विलासराव पाटील आणी कलाकार सभासदानी तीची ऊत्क्रूष्ठ गायिका म्हणून निवड केली. अन हा पुरस्कार स्वीकारताना नाम.हसन मुश्रीफ यानी अम्रूताला अभंग,गौळण व लावणी म्हणावयास सांगीतले. यावेळी अम्रूताने गायन केल्यानंतर तीच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून भविष्यात तु चांगली गायिका होऊन आईवडील, मार्गदर्शक, गावाचे व लोककलाकार संघाचे नावलौकिक करशील असे गौरवोद्गार काढले.
यावेळी लोककलाकार संघाचे राज्यसंपर्क प्रमूख रामचंद्र चौगले कुडूत्रीकर यानी अम्रूता घुगरे हिच्या गायनप्रवासाचे वर्णन केले. अम्रूताला सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व बुके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शशीकांत खोत, जि.प.सदस्य ऊमेश आपटे, संघाच्या जिल्हाध्यक्षा अनिता मगदूम, संघटक अशोक पोवार, आजरा तालुकाध्यक्ष राजाराम कोपटकर, शाहीर निवृत्ती कुंभार, सुरेश पाटील, दादासो पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!