ताज्या घडामोडी

मुंबईत २९ एप्रिल ते १ मे राज्यस्तरीय समुह कलाप्रदर्शन

Spread the love

ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड आयोजित रज्यस्तरीय समूह कालाप्रदर्शन 2022

ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय समूह कला प्रदर्शनाचे आयोजन. दिनांक २९ एप्रिल ते १ मे २०२२ या दरम्‍यान पु. ल .देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी. (दादर )मुंबई सिद्धिविनायक मंदिराच्या मागे सकाळी ११ ते सायंकाळी ०७ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

कलाशिक्षक, चित्रकार विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व योग्य व्यासपीठ मिळावे म्हणून महाराष्ट्रातील निवडक कलाकारांना एकत्र घेऊन कला प्रदर्शन भरवत आहेत.
या प्रदर्शनामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, बुलढाणा ,नाशिक इ. जिल्ह्यातील कलाप्रेमी या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले आहेत. या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या सर्व कलाप्रेमींना ०१ मे महाराष्ट्र दिन व ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड च्या वर्धापन दिनानिमित्त राजा रवी वर्मा ग्रेट आर्टिस्ट २०२२ पुरस्कार देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. कला तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावी व छोट्या मोठ्या कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळावे हे लक्षात घेऊन हे प्रदर्शन भरवत आहेत. तसेच हे प्रदर्शन बघण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व कलारसिकांना येऊन हे प्रदर्शन दि. २९ एप्रिल ते ०१ मे २०२२ सकाळी ११ ते सायंकाळी ०७ या वेळत विनामुल्य येऊन बघावे असे आवाहन संस्थेच्या संचालिका मेघा महाजन यांच्या मार्फत आवाहन करण्यात आले आहे.

या राज्यस्तरीय कला प्रदर्शनासाठी प्रमुख अतिथी म्हणून कपिल पाटील (शिक्षक आमदार मुंबई), अनिल नाईक (आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार), अनिल बोरनारे (प्रदेश उपाध्यक्ष भाजप शिक्षक आघाडी), डॉ.गीतांजली सालीयन (मुख्याध्यापिका चेंबूर कर्नाटक हायस्कूल), संदीप सोमण (सुप्रसिद्ध सिनेअभिनेते), सुभाष मोरे (शिक्षक भारती कार्याध्यक्ष), अनिल गोवळकर (चित्रकार व सुलेखनकार) हे उपस्थित राहणार आहेत. तर चित्रकला प्रदर्शनामध्ये सहभागी चित्रकार म्हणून हेमंत वसंतराव खंडाळे, बुलढाणा, रमेश झगडे मुंबई, विजय जोगमार्गे ठाणे, सुनिल पवळे नाशिक, चित्रकार शंकर सोनवणे नवी मुंबई, अरुणा फाटक ठाणे, सविता घोडे पुणे, भाग्यश्री मनोहर नडीमेटला-कन्ना (कर्णबधिर), प्रज्ञा पाटील पुणे, कु. शक्तीप्रिया रामनाथन मुंबई, दिव्या अहिरराव ठाणे, ज्ञानेश्वर माळी पालघर, भास्कर खेडकर पालघर, सचिन पालव मुंबई, सर्वेश मोगरे पालघर, दिलीप माळी पुणे, कौशिक जाधव पालघर, रमेश देशमाने मुंबई, भगवान पाटील (मुंबई), सागर पाटणकर (मुंबई), विनोद सपकाळ (मुंबई), तुलसीदास वाघ ठाणे, कु.गीत पाणेकर मुंबई, शुभम वाकेकर कल्याण, प्रीतम देवाडिगा मुंबई, मनोहर बाविस्कर मुंबई, समाधान रोकडे (नवी मुंबई), चेतन काजरेकर (नवी मुंबई), जितेंद्र अहिरराव (मुंबई), श्रीराम महाजन (मुंबई), राजेंद्र जाधव (पुणे) हे चित्रकला शिक्षक उपस्थित राहणार आहेत.
हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी मनोहर बाविस्कर, जितेंद्र अहिरराव, समाधान रोकडे, श्रीराम महाजन खूप मेहनत घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!