ताज्या घडामोडी

खास शिवजयंती उत्सवाचे दिवशी धरला विवाहाचा मुहूर्त,

Spread the love

ईगल न्युज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रथम शिवाजी महाराजांचे पुस्तकरुपी विचार वाटप करून मगच लावला विवाह* आज दिनांक 19 फेब्रुवारी 2022 वार- शनिवार रोजी रामचंद्र ताराचंद खैरनार यांचे चिरंजीव हर्षल व वसंत बाबुलाल पाटील यांची सुकन्या सौ का भावना यांच्या विवाह आयोजित करण्यात आला होता प्रथम वधु-वर यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना अधीन राहून हा विवाह आज रोजी करण्यात आला. वाघ व खैरनार परिवाराकडून लग्न सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक वाटप करण्यात आले जिजाऊ वंदना करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येक घरात पोचायला हवे यासाठी राबवलेला हा नाविन्यपूर्ण उपक्रम खरंच कौतुक करण्यासारखा होता प्रथम पुस्तकाचे वाटप करण्यात आले नंतर विवाह सोहळा साजरा करण्यात आला तसेच आलेल्या पाहुण्यांमंडळी च्या वतीने ईगल न्युज प्रतिनिधी एस एम पाटील यांनी व अशोक बाबुलाल वाघ यांनी सपत्निक पूजन केले या उपक्रमाचे समाजातील सर्व स्थरातून कौतुक होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!