क्रीडा व मनोरंजन

विद्यार्थीला विजेतेपद तर ओम साईश्वरला उपविजेतेपद परळ इच्छापूर्ती चषक २०२२ कुमार गट मुंबई जिल्हा निमंत्रित खो-खो स्पर्धा

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

मुंबई, २५ एप्रिल (क्री. प्र.) : लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अमृत महोत्सवी (७५ वे वर्ष) वर्षानिमित्त दिनांक २३ व २४ एप्रिल २०२२ या कालावधीत लाल मैदान, आई माई मेरवानजी स्ट्रीट, परळ येथे (परळ इच्छापूर्ती चषक २०२२) १८ वर्षाखालील कुमार गट जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा संपन्न झाली.

कुमार गटाच्या अंतिम सामन्यात विद्यार्थी क्रिडा केंद्राने ओम साईश्वर सेवा मंडळाचा (१२-०४-०५) १२-०९ असा १ डाव व ०३ गुणांनी पराभव केला. विद्यार्थीतर्फे प्रतिक घाणेकरने ३:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०२ गडी बाद केले. जनार्दन सावंतने २:१०, ३:४० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०१ गडी बाद केला. पियूष काडगेने २:२०, नाबाद १:०० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०२ गडी बाद केले. ओम साईश्वरतर्फे सोहम खाडेने २:१०, १:१० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०३ गडी बाद केले. नितेश अष्टमकरने १:३० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला.

कुमार गटाच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिराने ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराचा ०५-०३ असा ०२ गुणांनी पराभव केला.

त्यापूर्वी झालेल्या कुमार गटाच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने श्री समर्थ व्यायाम मंदिराचा (०५-०८-१०-०५) १५-१३ असा ०२ गुण व १:२० मिनिटे राखून पराभव केला. ओम साईश्वरतर्फे देवांग ताम्हणेकरने २:५०, ४:४० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०१ गडी बाद करत अष्टपैलू खेळ केला. यज्ञेश तुळसकरने २:१० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०४ गडी बाद केले. सोहम खाडेने १:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०४ गडी बाद केले. श्री समर्थतर्फे विशाल खाकेने ४:१०, १:४० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०५ गडी बाद केले. हितेश आग्रेने नाबाद १:४०, ३:३० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०६ गडी बाद करून चांगला खेळ केला.

कुमार गटाच्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्राने ओम समर्थ व्यायाम मंदिराचा (१३-०४-०८) १३-१२ असा १ डाव व १ गुणांनी पराभव केला. विद्यार्थीतर्फे प्रतिक घाणेकरने ३:४० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०३ गडी बाद केले. जनार्दन सावंतने १:४०, २:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०१ गडी बाद केला. पियूष काडगेने १:४० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०३ गडी बाद केले. ओम समर्थतर्फे तेजस सनगरेने १:१०, १:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०१ गडी बाद केला. सोहम विलनकरने आक्रमणात ०४ गडी बाद केले.

या स्पर्धेचा बक्षीस समारंभ वितरण नगरसेविका श्रीमती सिंधुताई मसुरकर, मंडळाचे अध्यक्ष अशोक देसाई, मानद सचिव धनंजय सावंत, खजिनदार रवींद्र पाताडे, विश्वस्त मंडळ, विद्यार्थीचे अध्यक्ष गजानन वाईरकर, कार्यध्याक्ष यशवंत नाईक, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे खजिनदार ॲड. अरुण देशमुख, मुंबई खो खो संघटनेचे प्रमुख कार्यवाह सुरेंद्रकुमार विश्वकर्मा, कार्यध्याक्ष सुधाकर राऊळ,खजिनदार जतीन टाकळे याच्या हस्ते पार पडला.

सर्वोत्कृष्ट आक्रमक – सोहम खाडे (ओम साईश्वर), सर्वोत्कृष्ट संरक्षक – जनार्दन सावंत (विद्यार्थी) अष्टपैलू – प्रतिक घाणेकर (विद्यार्थी)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!