ताज्या घडामोडी

श्री.मुरलीधर चांडगे यांची परभणी जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या अध्यक्ष पदी फेरनिवड.

Spread the love

डॉ.सुनील ना.भावसार

दिनांक २४ एप्रिल २०२२ रोजी, जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघ, परभणीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये श्री.मुरलीधर चांडगे (विद्यमान अध्यक्ष) यांची जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी संघाच्या अध्यक्ष पदी पंचवार्षिक कालावधी साठी एकमताने फेर निवड करण्यात आली आहे. सदर संघटना नोंदणी कृत आसून, या संघाचे ५११ सभासद आहेत यापैकी ९७ आजीवन सभासद आहेत. महाराष्ट्र राज्यात ही एकमेव अशी संघटना आहे की,यात जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग ३ व ४ सेवा निवृत्तस वर्गांचा समावेश आहे. निवृत्त धारकांच्या सेवानिवृत्तीचे संदर्भातील समस्या सोडविणे हा एकमेव उद्देश आहे. दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी पेन्शन अदालत मध्ये त्यांच्या तक्रारी प्रशासना समोर मांडण्यात यातात व त्या प्रश्नाचा पाठपुरावा संघटनेच्या वतीने केला जातो.श्री मुरलीधर चांडगे हे या संस्थेचे संस्थापक आहेत. त्याच्या कुशल कामगिरी मुळे त्यांची फेर निवड करण्यात आली. त्यांचे समाजाच्या सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!