ताज्या घडामोडी

तासगाव राजापूर मार्गावरील पावलेवाडी व कोकरूड गावातील रखडलेले रस्ता काम तात्काळ करा

Spread the love

तहसीलदार गणेश शिंदे यांना बारा बलुतेदार संघामार्फत निवेदन शिराळा प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असणारे तासगाव राजापूर राज्य मार्गाचे शिराळा तालुक्यातील पावलेवाडी व कोकरूड गावामधील रस्ता काम रखडले असल्याने ते तात्काळ पूर्ण करावे अशा आशयाचे निवेदन बारा बलुतेदार संघामार्फत जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कदम यांनी तहसीलदार गणेश शिंदे यांना देण्यात आले. या निवेदनात जिल्हाध्यक्ष कदम पुढे म्हणतात की, गेले वर्षभरापासून तासगाव राजापूर राज्य मार्गाचे काम सुरू आहे. मात्र शिराळा तालुक्यातील पावलेवाडी व कोकरूड या दोन्ही ठिकाणी या राज्य मार्गाचे काम रखडले आहे. तालुक्यातील पावले वाडी येथे रस्ता अत्यंत अरुंद आहे. त्याचबरोबर गेल्या कित्येक दिवसापासून या ठिकाणी हा रस्ता ठेकेदाराने रखडवला आहे. रस्त्याच्या मधोमध नाले काढले आहेत. एवढ्या चिंचोळ्या रस्त्याला दुहेरी वाहन याची वाहतूक होणे कठीण आहे. तरीदेखील याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करून या रस्ताचे काम करणाऱ्या ठेकेदाराला ‘अर्थपूर्ण’ पाठिंबा दिसत आहे. या दोन्ही ठिकाणी वारंवार रस्ता अरुंद असल्याने ट्रॅफिक जाम होत असते. अनेक वेळा या मार्गावर अपघात झाले आहेत. तरी कृपया याची महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधित ठेकेदार याच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी बारा बलुतेदार संघटनेमार्फत या निवेदनात केली आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष कदम यांच्यासह कार्याध्यक्ष तेजस सन्मुख, उपाध्यक्ष संभाजी कांबळे, सचिव सुमित मोहिते, मीडिया प्रमुख संजय गायकवाड आदी सर्व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!