ताज्या घडामोडी

कळझोंडी येथे तीन दिवसीय आधार नोंदणी व आधारकार्ड अपडेट कॅम्पचे आयोजन

Spread the love

लाभ घेण्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी व शामराव पेजे शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे आवाहन

जाकादेवी/संतोष पवार :-जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी आणि लोकनेते शामरावजी पेजे शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 26 ते 28 या तीन दिवसीय कालावधी कळझोंडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. १ येथे आधारकार्ड नवीन नोंदणी व आधार अपडेट कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून कळझोंडी ग्रामस्थांनी या कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी व लोकनेते शामराव पेजे शैक्षणिक व सामाजिक संस्थेने केले आहे.
या कॅम्पच्या यशस्वीतेसाठी जाकादेवी येथील महा-ई-सेवा केंद्राच्या संचालिका सौ.वृंदा शेवडे ,संचालक श्री.विश्वास शेवडे, तसेच संगणक ऑपरेटर ज्योती थापा यांचे यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे. तरी कळझोंडी गावातील ग्रामस्थांनी नवीन आधार नोंदणी तसेच आधार अपडेट करण्यासाठी या कॅम्पचा आवर्जून लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे .
या कॅम्पच्या यशस्वी‌ करण्यासाठी जिल्हा विधी प्राधिकरण रत्नागिरी येथील कायदा साथी अरुण मोर्ये, सामाजिक कार्यकर्ते संजय शितप व कळझोंडी ग्रामस्थ मेहनत घेत आहेत. आधार कार्ड अपडेट अत्यंत महत्त्वाचे असून आधार कार्डच्या अपडेटमुळे शैक्षणिक ,सामाजिक कामे तसेच बँकिंग, विविध शिष्यवृत्त्या, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड महत्त्वाचे मानले जाते. तरी या कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन संजय शितप ,अरुण मोर्य यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे केले आहे. लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आधार आधार अपडेशन करण्यात येणार असल्याचेही अरुण मोर्ये, संजय शितप यांनी सांगितले. या कॅम्पच्या आयोजनाबद्ल कळझोंडी ग्रामस्थांनी आयोजकांना मनापासून धन्यवाद दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!