ताज्या घडामोडी

11 मे महात्मा दिन साजरा करण्यासंदर्भात श्री संत सावता माळी युवक संघाची ऑनलाइन आढावा बैठक संपन्न

Spread the love

श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य वार्षिक पदाधिकारी चर्चासत्र 2022 या कार्यक्रमाच्या माध्यमातून अकोला जिल्हा व अमरावती जिल्हा युवक संघाचे सर्व पदाधिकारी या मीटिंग ला उपस्थित होते. सदर मीटिंग मध्ये महत्वाचा विषय म्हणजे 11 मे महात्मा दिन हा विशेष रूपाने साजरा करण्यात यावा हा चर्चासत्राचा विशेष केंद्रबिंदू होता.

11 मे 1888 रोजी महाराष्ट्र मधील दुसरे समाजसुधारक रावबहादूर विठ्ठलराव कृष्णाजी वडेकर यांच्या हस्ते मुंबई येथील कोळीवाडा येथील जनतेने जोतिबा फुलेंना महात्मा ही पदवी प्रदान केली.

म्हणून 11 मे हा महात्मा दिन म्हणून राज्यभर विशेष स्वरूपाने साजरा करण्यात यावा. या संदर्भात 2016 साल पासून श्री संत सावता माळी युवक संघ शासनाला सातत्याने पाठपुरावा करत आहे व विविध उपक्रम व समाजकल्याणाच्या माध्यमातून 11 मे हा महात्मा दिन म्हणून साजरा करण्याचे आयोजन करत असते.

यावर्षी ही अशाच नियोजन संदर्भात पूर्ण राज्यभर ही आढावा बैठक आयोजित केल्या आहेत.या आढावा बैठक ला श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड,संघाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्रजी महाजन,संघाचे प्रदेश उपाध्यक्ष ह.भ.प.विशाल गाडगे महाराज,प्रदेश कार्याध्यक्ष कैलासजी शिंदे साहेब यांची प्रामुख्याने उपस्थिती होती व सर्व पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन प्राप्त झाले व या मीटिंग ला दोनही जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच या मीटिंग ला रवीराजजी शेवलकार,डॉ.प्रकाश धुपे,अंकुशजी ढोकणे, गौरवजी अढाऊ,प्रशांतजी खाडे, उमेशजी राखोंडे,दत्ताजी गिरहे,अमरावती जिल्हाध्यक्ष वैभवजी निमकर साहेब,रोशनजी बोंबटकार, गोपालजी बंड व इतर अनेक पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

या सदर मीटिंग चे आभार प्रदर्शन संघाचे अकोला जिल्हाध्यक्ष व कार्यसम्राट अजयजी बंड यांनी केले व तसेच आपल्या पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!