ताज्या घडामोडी

न्यू. इंग्लिश स्कूल सैतवडे या शाळेचा रस्ता कामास सुरवात

Spread the love

वाटद जिल्हा परिषद गटातील न्यू. इंग्लिश स्कूल सैतवडे या शाळेचा रस्ता गेली कित्येक वर्षे रखडलेला होता.तसे पाहता शाळांकडे तस कोणीच आतापर्यंत लक्षच दिलेलं नव्हतं.परंतु मेन रस्त्यापासून आत असणाऱ्या शाळांकडे स्वतः पेशाने शिक्षिका असणाऱ्या या गटातील जिल्हा परिषद सदस्य सौ.ऋतुजा राजेश जाधव यांनी शाळांकडे लक्ष दिले.आपले मार्गदर्शक उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना.उदयजी सामंत साहेब,तालुकाप्रमुख तथा नगराध्यक्ष मा.बंड्याशेठ साळवी,उद्योगपती मा.भैयाशेठ सामंत यांचे मार्गदर्शन व सहकार्यातून अगदी जिल्हा परिषदशाळा त्यांची दुरुस्ती,नवीन इमारती,मैदाने,विंधन विहिरी,विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी,शिक्षकांचे लसीकरण या महत्वाच्या शाळांच्या घटकांकडे त्यांनीआवर्जून लक्ष दिले.त्यामुळे पूर्ण गटातून विद्यार्थी व पालक,ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले.या शाळा प्रत्येक निवडणुकीसाठी वापरल्या जातात तिथे येणारे अधिकारी त्यांची गैरसोय होत असते.आणि शाळा ह्या अद्ययावत असल्याच पाहिजे असे मत सौ.जाधव यांनी व्यक्त केले.जी.प. पंधरावित्तचा निधी खर्च करून त्यांनी न्यू.इंग्लिश स्कूलचा रस्ता बनवला.त्यांना ग्रा.प.सैतवडेचे सरपंच सागर कदम,सदस्य साजिद शेकासन,उपसरपंच सौ.पेटकर व सर्व सदस्य यांनी समाधान व्यक्त केले व सौ.जाधव यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!