ताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, मुंबई उपनगर जिल्हा आयोजित कलाहर्ष चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

Spread the love

मुंबई प्रतिनिधी :- शनिवार दिनांक 23 एप्रिल 2022 रोजी अफॅक इंग्लिश स्कूल, चेंबुर या शाळेच्या सभागृहामध्ये कलाहर्ष कलागुण गौरव भव्य पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी 76 स्पर्धक 21 कलाशिक्षक 10 मुख्याध्यापक यांना बाल कलाकार, बाल चित्रकार ,कलारत्न,कलाप्रेमी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले,मुंबई उपनगरातून सौ. सुचिता साटम व सौ. राजश्री सुखी यांना आदर्श कला शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले .या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री.जितेंद्र मंडलेचा सर सचिव, (अफॅक ट्रस्ट ) श्री.किसन पावडे पाटील( प्रशासकीय अधिकारी मुंबई महानगर पालिका) मा. श्री. दिनकर पाटील प्राचार्य कला अकदमी मुंबई मा. श्री. नागेश वाघमोडे (परिक्षा नियंत्रक कला संचालनालय महाराष्ट्र राज्य ) मा.सौ. साधना पाटील प्राचार्या अफॅक स्कूल, कॅमल कंपनीचे प्रतिनिधी आणि या कार्यक्रमासाठी श्री चित्रकार अमोल पवार (मुंबई )यांनी निसर्गचित्र यावर प्रात्यक्षिक इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून या स्पर्धेचे आयोजन प्रत्येक वर्षी केले जाते असे उपनगर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाशचंद्र मिश्रा सरानी केले यावेळी श्री टी. के सुतार सचिव यांनी संघाबद्दल माहिती,संघाचे कार्य , कलेचा विकास कार्यशाळा, आयोजित केले जातात असे प्रास्ताविकात सांगितले.या स्पर्धेमध्ये मुंबई उपनगरातून असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. सर्व विजयी स्पर्धकांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व कॅम्लीनचे रंग साहित्य पुरस्कार स्वरूप मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रुचिता बोलाडे यांनी केले.आभार प्रदर्शन श्री.चिंतामण भामरे यांनी केले.ही स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ यशस्वी करण्यासाठी प्रकाशचंद्र मिश्रा, टी. के. सुतार, निलेश उतेकर,योगेश पाटील, चिंतामण भामरे , नेहा साळवी प्रमोद कुरणे, दीपक चौधरी , रजनी परमार, संदेश अमृतकर, प्रकाश कारंडे ,रविंद्र मोहिते, प्रेरणा बर्वे संदोप तावडे श्रीराम महाजन संतोष मेस्त्री स्नेहल मयूर रणवरे इ. कला शिक्षकांनी खूप मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!